कार्यकारी अभियंत्यांनी केली औरंगाबाद रस्त्याची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:21+5:302021-02-05T05:53:21+5:30
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग जालना पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता ओंकार चांडक हे शुक्रवारी जळगावला नियोजन समितीच्या बैठकीला आले होते. ...

कार्यकारी अभियंत्यांनी केली औरंगाबाद रस्त्याची पाहणी
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग जालना पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता ओंकार चांडक हे शुक्रवारी जळगावला नियोजन समितीच्या बैठकीला आले होते. त्यांनी औरंगाबाद महामार्गाची पाहणी केली. औरंगाबाद रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी केली होती.
या बाबत लोकमतशी बोलताना चांडक यांनी सांगितले की, ज्या कामाबाबत तक्रार करण्यात आली आहे. ते तात्पुरते काम आहे. त्याचे कोणतेही देयक देण्यात येणार नाही. त्यामुळे तक्रारीचा प्रश्नच येत नाही. तसेच ज्यांना कामाची माहिती हवी आहे. ती प्रकल्प संचालक आणि संबंधित एजन्सीकडून मिळू शकते. तसेच या प्रकल्पाचे काम हे योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे पाहण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट देखील केले जाते. तसेच सर्वच कच्च्या मालाच्या तपासण्या केल्या जातात.