नॅक समितीची मणियार महाविद्यालयात पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 21:53 IST2019-10-12T21:52:37+5:302019-10-12T21:53:27+5:30

जळगाव - नॅक मूल्यांकनासाठी नुकतेच शहरातील एस़एस़मणियार विधी महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यमापन आणि मूल्यांकन परिषद नियुक्त त्रिसदस्यीय समितीने भेट देवून ...

Examine the Nac Committee at Maniar College | नॅक समितीची मणियार महाविद्यालयात पाहणी

नॅक समितीची मणियार महाविद्यालयात पाहणी


जळगाव- नॅक मूल्यांकनासाठी नुकतेच शहरातील एस़एस़मणियार विधी महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यमापन आणि मूल्यांकन परिषद नियुक्त त्रिसदस्यीय समितीने भेट देवून पाहणी केली.

यावेळी नॅक समितीमध्ये प्रा़ डॉ़ मेहराज उददीन मीर, प्रा़ डॉ़ एम़एस़सौंदरा पांडीयन, प्रा़ डॉ़ ममता राव यांचा समावेश होता़ या समितीने ११ व १२ आॅक्टोबर रोजी महाविद्यालयाला भेट दिली़ दोन दिवसात पाहणी करून अभ्यासक्रम, अध्यापन, संशोधन, पायाभूत सुविधा, विद्यार्थी सुविधा यासह महाविद्यालयीन कामकाजाची तपासणी केली़ त्याचबरोबर महाविद्यालयाच्या व्यवस्थापन परिषदेशी संवाद साधला, त्यानंतर प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
समितीकडून देण्यात आलेल्या दोन दिवसांच्या भेटीप्रसंगी झालेल्या बैठकांमध्ये केसीईचे उपाध्यक्ष प्रकाश़बी़पाटील, प्राचार्य डॉ़बी़युवाकुमार रेड्डी, प्रा़ डी़आऱक्षीरसागर, डॉ़डी़जी़हुंडीवाले, डॉ़ रेखा पाहुजा, प्रा़ जी़व्ही़ धुमाळे, प्रा़ योगेश महाजन, डॉ़ अंजली बोंदर, डॉ़ विजेता सिंग यांची उपस्थिती होती.

Web Title: Examine the Nac Committee at Maniar College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.