८ डिसेंबरपर्यंत भरता येणार परीक्षा अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 09:24 PM2020-12-03T21:24:11+5:302020-12-03T21:24:21+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.व्होक, बी.ए.(एम.सी.जे.), बी.एस.डब्ल्यू. आणि ...

Examination forms can be filled till December 8 | ८ डिसेंबरपर्यंत भरता येणार परीक्षा अर्ज

८ डिसेंबरपर्यंत भरता येणार परीक्षा अर्ज

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिकविल्या जाणाऱ्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.व्होक, बी.ए.(एम.सी.जे.), बी.एस.डब्ल्यू. आणि विद्यापीठ प्रशाळांतील बी.एस्सी.(ॲक्च्युरियल सायन्स), एम.ए., एम.एस्सी., एम.सी.ए., एम.बी.ए., एम.ए.(एम.सी.जे.), एम.एस.डब्ल्यू., बी.टेक., एम.टेक. या अभ्यासक्रमांच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांकरीता ६ डिसेंबर पर्यंत आणि ५० रूपये विलंब शुल्कासह ८ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाविद्यालयांनी विलंब शुल्क विरहीत परीक्षा अर्ज ७ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन इनवर्ड करावयाचे आहेत. तर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा अर्ज विद्यापीठास ९ डिसेंबर पर्यंत सादर करावे लागणार आहे. हे परिपत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव पसरु नये याकरीता विद्यार्थ्यांनी शक्यतो ऑनलाईन परीक्षा अर्ज व शुल्क भरावेत आणि महाविद्यालयांनी कोरोना संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करुन परीक्षा अर्जांबाबतची कार्यवाही करावी असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

 

Web Title: Examination forms can be filled till December 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.