‘इव्हीएम भांडाफोड’ राष्ट्रीय परिवर्तन यात्रेचे उद्या आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 18:39 IST2023-03-01T18:39:00+5:302023-03-01T18:39:06+5:30

लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काढलेली ‘इव्हीएम भांडाफोड राष्ट्रीय परिवर्तन यात्रा’ शुक्रवारी जिल्ह्यात येत आहे.

'EVM Bhandabode' National Transformation Yatra to arrive tomorrow | ‘इव्हीएम भांडाफोड’ राष्ट्रीय परिवर्तन यात्रेचे उद्या आगमन

‘इव्हीएम भांडाफोड’ राष्ट्रीय परिवर्तन यात्रेचे उद्या आगमन

कुंदन पाटील

जळगाव : लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काढलेली ‘इव्हीएम भांडाफोड राष्ट्रीय परिवर्तन यात्रा’ शुक्रवारी जिल्ह्यात येत आहे.

दि.३ मार्च रोजी ही यात्रा धुळ्याहून अमळनेर, धरणगाव, जळगावमार्गे  जामनेर येथे जाईल.  जामनेरच्या जुन्या पंचायत समितीसमोर सायंकाळी ६ वाजता सभा होईल.   या सभेच्या अध्यक्षस्थानी वामन मेश्राम असतील. जिल्हा बॅंकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याहस्ते सभेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेज़ी   ॲड.मनीषा देशमुख, नितीन देशमुख, यु.डी.पाटील, राजेंद्र खरे, डॉ.प्रशांत पाटील आदी वक्ते  उपस्थित राहणार आहेत.    

शहरात होणार स्वागत

शुक्रवारी दुपारी १ वाजता या यात्रेचे आकाशवाणी चौकात स्वागत करण्यात येणार आहे. जनतेने उपस्थिती द्यावी, असे आवाहन  भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: 'EVM Bhandabode' National Transformation Yatra to arrive tomorrow