डेंग्यूला पळविण्यासाठी कजगावात सारे एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:17 IST2021-07-31T04:17:30+5:302021-07-31T04:17:30+5:30
कजगाव (ता. भडगाव) : येथे गेल्या १५ दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यूसाठी हॉटस्पॉट ठरलेल्या जीन भागातील स्थानिक ...

डेंग्यूला पळविण्यासाठी कजगावात सारे एकवटले
कजगाव (ता. भडगाव) : येथे गेल्या १५ दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यूसाठी हॉटस्पॉट ठरलेल्या जीन भागातील स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत व आरोग्य खाते हे सारेच डेंग्यू पळविण्यासाठी एकवटले आहेत. २८ रोजी जीन भागातील नागरिकांनी लोकवर्गणीतून हा परिसर जेसीबीद्वारे साफ केला, तर ग्रामपंचायतीच्यावतीने औषध फवारणी आरोग्य खात्याकडून सर्वेक्षणासह डबक्यात औषध टाकत सामूहिकरीत्या साऱ्याचे प्रयत्न डेंग्यू पळविण्यासाठी सुरू आहेत.
गेले १५ दिवसांपूर्वी स्टेशन रोड परिसरात डेंग्यूचे दोन रुग्ण व जीन भागातील तीन रुग्ण असे पाच डेंग्यू रुग्ण आढळल्याने कजगावात घबराट पसरली होती. ही संख्या वाढतच जात असताना कजगाव-नागद रोडवरील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील जीन भाग हा डेंग्यूचा हॉटस्पॉट ठरल्याने कजगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच वैशाली पाटील यांनी या भागाबरोबरच संपूर्ण गावात धूर औषध फवारणी केली.
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सर्वेक्षण, तसेच डबके व उघड्या टाक्यांसह ओस पडलेल्या वस्तूंवर औषध टाकण्यात आले. कजगाव प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांनी स्वत: हॉटस्पॉट ठरलेल्या भागात जाऊन सर्वेक्षण केले. आरोग्य पथक तयार करून संपूर्ण गावात प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेवर स्पीकर लाऊन जनजागृती करण्यात आली. सोबतच घरासमोर उघड्यावर ओस पडलेल्या साहित्यावर औषध टाकण्यात आले. उघड्या टाक्या उलटल्या.
ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण गावात धूर औषध फवारणी करण्यात आली. जीन भागातील साफसफाई संजय महाजन, मंगलसिंग पाटील, बापू मिस्तरी, विनोद हिरे, दिलीप पाटील, लालचंद पाटील, राजू मिस्तरी, अतुल बोरसे, नीलेश चौधरी, ईश्वर हिरे, श्यामकांत हिरे, रावसाहेब पाटील, मोहन चौधरी, सोनू देवरे, राकेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.