मराठीतून भाषणाला सुरुवातही व समारोपही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 13:26 IST2019-10-13T13:26:34+5:302019-10-13T13:26:59+5:30
जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

मराठीतून भाषणाला सुरुवातही व समारोपही
जळगाव : क स काय जळगाव, महाजनादेशसाठी तुम्ही सज्ज आहात ना? असे विचारात मराठीतून भाषणाला सुरुवात करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी ह्यपुन्हा आणूया आपले सरकारह्ण अशी घोषणा देत ती जनतेकडूनही वदवून घेतली. मोदी यांनी मराठीतूनच भाषणाला सुरुवात करीत समारोपही मराठीतूनच केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाष्ट्रातील पहिली सभा रविवारी जळगावात झाली. त्या वेळी त्यांनी मराठीतून बोलून उपस्थितांची मने जिंकली.