नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूल श्रींची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST2021-09-12T04:19:41+5:302021-09-12T04:19:41+5:30

नशिराबाद: येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विभागात गणरायाची विधिवत स्थापना झाली. संस्थेचे संचालक संदीप महाजन यांच्या हस्ते सपत्निक पूजन ...

Establishment of Nasirabad New English School | नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूल श्रींची स्थापना

नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूल श्रींची स्थापना

नशिराबाद: येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विभागात गणरायाची विधिवत स्थापना झाली. संस्थेचे संचालक संदीप महाजन यांच्या हस्ते सपत्निक पूजन झाले. यावेळी कार्याध्यक्ष योगेश पाटील व सचिव मधुकर चौबे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रवीण महाजन, माध्यमिक उपमुख्याध्यपक सी.बी. अहिरे, पर्यवेक्षक बी.आर. खंडारे उपस्थित होते. श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या १० वी व १२ वी त अधिकत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी शिक्षक दिनानिमित्त सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक ज्युनिअर कॉलेज व किमान कौशल्य विभागाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सर्वांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आर. एल. पाचपांडे यांनी केले. तर नियोजन संगीता जोशी व पूजा पाटील यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.

Web Title: Establishment of Nasirabad New English School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.