शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

एरंडोलवर भीषण पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:40 IST

अंजनी धरणातील जलाशयात यंदाच्या पावसाळ्यात पाणीसाठा वाढला नाही. त्यामुळे सध्य:स्थितीत असलेल्या पाणी साठ्याचे बाष्पीभवन व लॉसेस यांचा विचार केला असता डिसेंबरअखेर पुरेल अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देनवीन वर्षात एरंडोल शहरावर जलसंकटअंजनी धरणात डिसेंबरपर्यंतचा जलसाठागिरणा धरणात केवळ ४८ टक्के जलसाठा

एरंडोल : अंजनी धरणातील जलाशयात यंदाच्या पावसाळ्यात पाणीसाठा वाढला नाही. त्यामुळे सध्य:स्थितीत असलेल्या पाणी साठ्याचे बाष्पीभवन व लॉसेस यांचा विचार केला असता डिसेंबरअखेर पुरेल अशी स्थिती आहे. त्यामुळे २०१९ हे नवीन वर्ष शहरावर तीव्र पाणी संकट घेऊन येणार की काय अशी चिंता व्यक्त केली जाते.यावर्षी गिरणा धरणात ४८ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे सिंचन आवर्तन सुटण्याची शक्यता नाही. गेल्या वर्षी जामदा कालव्याचे पाणी पारोळा तालुक्यातील धोत्रा एस्केपद्वारे सोडून अंजनी धरणाचे ३५ दलघफू इतक्या पाण्याने पुनर्भरण करण्यात आले होते. पण यंदा सिंचन आवर्तनच बसत नसल्यामुळे अंजनीचे जलाशयात पाणी भरले जाऊ शकत नाही.त्यामुळे एरंडोल शहराला भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासंदर्भात एकमेव पर्याय गिरणा नदीच्या पाण्याचा शिल्लक आहे. गिरणा नदी काठावरील गावांचे पाणीप्रश्नी गिरणा नदीला पाणी सोडण्यात येणार आहे, असे संकेत मिळाले आहेत. एकूण पाच आवर्तने प्रस्तावित असून पहिले आवर्तन नोव्हेंबर महिन्यात सोडण्यात येईल असे समजतो.या बिगर सिंचन पाण्याचे आवर्तन दहिगाव बंधाऱ्यावरील कालव्याला नागदुलीपर्यंत सोडल्यास तेथे कालव्याला बांध करून पाणी अडवणे शक्य होईल व एरंडोल शहराला पाईप लाईनद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य आहे.या पर्यायी व्यवस्थेसाठी नगरपालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही आतापासून करावी, अशी मागणी आहे. या वर्षात पाण्याचे सिंचनासाठी एकही गिरणेचे आवर्तन नाही. त्यामुळे अंजनी धरणाचे पुनर्भरणही नाही. सारी मदार गिरणा नदीला सोडण्यात येणाºया आवर्तनावरच आहे. गिरणा नदीचे आवर्तनामुळे एरंडोल शहराला दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :WaterपाणीErandolएरंडोल