शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील करमणूक कर विभाग बंद होणार

By admin | Updated: June 15, 2017 12:43 IST

लवकरच जीएसटी लागू होणार असल्याने हा कर महापालिकेकडे जमा होईल व मनपाकडून तो पालिकांना दिला जाईल.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 15 -  जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेला करमणूक कर विभाग बंद करण्याच्या हालचाली सुरू असून या विभागातील कर्मचा:यांबाबत विभागीय आयुक्तांकडून माहिती मागविण्यात आली आहे. लवकरच जीएसटी लागू होणार असल्याने हा कर महापालिकेकडे जमा होईल व मनपाकडून तो पालिकांना दिला जाईल. वर्षाकाठी महसूल विभागास 8 ते 10 कोटींचा महसूल एकटय़ा करमणूक कर विभागाकडून मिळत असतो. करमणुकीची साधने असलेली चित्रपट गृहे व अन्य साधनांकडून करमणूक कर वसूल केला जात असतो. जिल्ह्यात बहुविध चित्रपटगृहे 2, एक पडदा 15, स्थायीवत 5 फिरती चित्रपटगृहे 3 अशी एकूण 25 चित्रपटगृहे, व्हिडीओ प्रदर्शन केंद्र 4, मनोरंजन उद्यान 1, व्हिडीओ गेम 4 व 12 ते 15 हजार केबल ऑपरेटरकडून वर्षाकाठी 8 ते 10 कोटींचा महसूल जिल्हा प्रशासनाकडे जमा होत असतो. करमणूक कराचे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यालय आहे. तहसीलदार दर्जाचा अधिकारी या कार्यालयाचा प्रमुख असतो. जिल्ह्याच्या ठिकाणी पाच ते सहा कर्मचारी तसेच प्रत्येक तहसील कार्यालयात करमणूक कर विभाग असतो. तालुक्याचे नियोजन या कार्यालयामार्फत चालते. जीएसटीमुळे बदलराज्यात 1 जुलै पासून जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू होत आहे. हा कर जमा करण्याचे मुख्यालय हे जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे जळगाव येथे असेल. जीएसटी अंतर्गत करमणूक कर वसुलीची जबाबदारी ही महापालिकेकडे येण्याचे संकेत आहेत. तेथून कराची रकम संबंधित पालिकांकडे वर्ग केली जाईल. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात असलेला करमणूक कर विभाग हा बंद  होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेला हा विभाग लवकरच बंद होणार आहे. या संदर्भात विभागीय आयुक्तांकडून जिल्हा प्रशासनास सूचना प्राप्त झाल्या असून या विभागातील कर्मचा:यांची सेवा अन्य विभागांमध्ये वर्ग केली जाणार आहे.