रिकाम्या टाक्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी उलटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST2021-07-28T04:16:31+5:302021-07-28T04:16:31+5:30
कजगाव, ता. भडगाव : येथे गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने डबक्यात, उघड्या टाक्यांत औषध फवारणी करणे ...

रिकाम्या टाक्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी उलटल्या
कजगाव, ता. भडगाव : येथे गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने डबक्यात, उघड्या टाक्यांत औषध फवारणी करणे सुरू असतानाच मंगळवारी गावात ओस पडलेल्या टाक्यांसह ओस पडलेले साहित्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी रिकामी करून उलट करून ठेवले.
कजगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यूने डोके वर काढले आहे. त्या दृष्टीने कजगाव ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
आरोग्यसेवकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावात फिरून घरासमोर ओस पडलेल्या पाण्याच्या टाक्यांसह इतर काही भांडी स्वत: आपल्या हातांनी उलट करून ठेवल्या. तसेच टायरसारख्या रिकाम्या वस्तूंवर औषध टाकत स्वच्छता मोहीम हाती घेतली.
येथे गेल्या आठ दिवसांपासून आरोग्य विभागामार्फत डेंग्यू सर्वेक्षण सुरू आहे. डेंग्यू सर्वेक्षण करताना कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी अशा वापरत नसलेल्या पाण्याच्या टाक्या आढळल्या. अशा टाक्यांवर झाकणे नव्हती म्हणून या टाक्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्या टाक्यांमध्ये डेंग्यू, हिवताप व चिकुनगुण्याची अंडी तयार होतात. अशा वापरत नसलेल्या पाण्याच्या टाक्या उलट कराव्यात, असे केल्याने त्या टाक्यांमध्ये डास तयार होत नाही. तरी सर्वांनी काळजी घ्यावी. डासांची उत्पत्ती रोखणे हाच एकमेव रामबाण उपाय आहे. दोन गोष्टींचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायत व आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे.