शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon Election: तुरुंगातून रणशिंग फुंकलं आणि मैदान मारलं; जळगावात ललित कोल्हेंच्या विजयाचा गुलाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:55 IST

Lalit Kolhe Victory: जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार ललित कोल्हे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवला असून, त्यांची आई सिंधुताई कोल्हे आणि मुलगा पियुष कोल्हे यांनीही विजयाचा गुलाल उधळला आहे.

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निकाल सुरू असताना जळगावमधून महत्त्वाची बातमी समोर आली. महायुतीचे उमेदवार ललित कोल्हे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवला असून, त्यांची आई सिंधुताई कोल्हे आणि मुलगा पियुष कोल्हे यांनीही विजयाचा गुलाल उधळला आहे. कोल्हे कुटुंबातील या तिन्ही सदस्यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी जळगावात मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले.

या विजयानंतर माध्यमांशी बोलताना ललित कोल्हे यांच्या पत्नी सरिता कोल्हे यांना अश्रू अनावर झाले. आपल्या मुलाची, पियुषची गळाभेट घेताना त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सरीता कोल्हे म्हणाल्या की, "माझे पती तुरुंगात आहेत. त्यांच्यावर अतिशय घृणास्पद आरोप करण्यात आले होते. पण आज आमच्या मतदारांनी मतांच्या रूपाने आशीर्वाद दिला आहे. हा विजय सत्याचा आणि जनतेच्या प्रेमाचा आहे."

या विजयामागे कोल्हे कुटुंबाचा मोठा त्यागही समोर आला. ललित कोल्हे यांना अटक झाल्यापासून सरिता कोल्हे आणि त्यांचा मुलगा पियुष कोल्हे यांनी चप्पल न घालण्याची शप्पथ घेतली. याबाबत बोलताना त्यांनी भरल्या डोळ्यांनी सांगितले की, "माझे पती, सासू आणि मुलगा तिघेही जिंकले आहेत. ललित कोल्हे अटकेत असल्यापासून आम्ही दोघांनी चप्पल घातलेली नाही. मी निश्चय केला होता की, ते परत आल्यावरच मी चप्पल घालेन. आज जनतेने ते शक्य करून दाखवले आहे."

प्रभाग क्रमांक ११ येथून ललित कोल्हे आणि त्यांच्या आई सिंधुताई कोल्हे यांच्यासह शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी झाले. तर, प्रभाग क्रमांक ४ येथून पियुष ललित कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून दणदणीत विजय संपादन केला. तुरुंगातून निवडणूक लढवूनही मतदारांनी दिलेल्या या कौलामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विजयानंतर विजयी मिरवणुकीत कार्यकर्त्यांच्या उत्साहापेक्षा कोल्हे कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रूच सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalgaon Election: From Jail to Victory, Lalit Kolhe Wins!

Web Summary : Lalit Kolhe won Jalgaon's election from jail. His mother and son also secured victories. Supporters celebrated, while his wife expressed emotional gratitude for the voters' support and the family's triumph, marking a significant win.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकMahayutiमहायुतीBJPभाजपाShiv Senaशिवसेना