आपत्कालीन निःस्वार्थी समाजसेवा म्हणजे राष्ट्रसेवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST2021-06-04T04:13:15+5:302021-06-04T04:13:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आपत्कालीन निःस्वार्थी सेवा म्हणजे नागरिकांची अमुल्य राष्ट्रीय सेवाच आहे, असे प्रतिपादन शिवचित्रकार मिलिंद विचारे ...

Emergency selfless social service is national service | आपत्कालीन निःस्वार्थी समाजसेवा म्हणजे राष्ट्रसेवाच

आपत्कालीन निःस्वार्थी समाजसेवा म्हणजे राष्ट्रसेवाच

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आपत्कालीन निःस्वार्थी सेवा म्हणजे नागरिकांची अमुल्य राष्ट्रीय सेवाच आहे, असे प्रतिपादन शिवचित्रकार मिलिंद विचारे यांनी केले.

सुपडू सुतार यांच्या जयंतीनिमित्त नुकताच कार्यक्रम पार पडला. त्यापसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला चित्रकार सुनील दाभाडे यांनी सुपडू सुतार यांचे साकारलेल्या चित्राचे अनावरण विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अरुण जाधव, विजय लुल्हे, राजाराम लुल्हे, मनोहर रूले, सुनील दाभाडे, सिंधु सुतार, इंदुमती लुल्हे, संजय वाघ आदी

उपस्थित होते.

वृक्षारोपण

विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळाच्या वस्तीगृहाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वनस्पती रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले, प्राचार्य राजेंद्र महाजन, अभियंता संजय भावसार,मनोहर बाविस्कर, संजय वाघ, शिरीष चौधरी,बाळकृष्ण मिस्तरी यांनी सहकार्य केले.

Web Title: Emergency selfless social service is national service