रस्ता ओलांडणाऱ्या वृध्दाला भरधाव दुचाकीची उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:10+5:302021-07-14T04:19:10+5:30

जळगाव : रस्ता ओलांडणाऱ्या वृध्दाला भरधाव दुचाकीने उडविल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जिल्हा क्रीडा संकुलासमोर घडली. वासुदेव ...

An elderly man crossing the road was hit by a speeding two-wheeler | रस्ता ओलांडणाऱ्या वृध्दाला भरधाव दुचाकीची उडविले

रस्ता ओलांडणाऱ्या वृध्दाला भरधाव दुचाकीची उडविले

जळगाव : रस्ता ओलांडणाऱ्या वृध्दाला भरधाव दुचाकीने उडविल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जिल्हा क्रीडा संकुलासमोर घडली. वासुदेव वायकोळे (७३, रा.गांधीनगर) असे जखमी वृध्दाचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

वासुदेव वायकोळे हे गांधी नगरात वास्तव्यास असून सोमवारी सायंकाळी ते स्टेडियम परिसरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळून पायी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी नवीन बसस्थानकाकडून कोर्ट चौकाकडे भरधाव जाणाऱ्या ट्रिपल सीट असलेल्या दुचाकीस्वाराने वायकोळे यांना जोरदार धडक दिली. या धडकेत वायकोळे हे गंभीर जखमी झाले. तर दुचाकीवरील तिघेही खाली कोसळले. अपघाताचा मोठा आवाज होताच, परिसरातील नागरिकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. नंतर वायकोळे यांना तत्काळ रुग्णालयात हलविले. घटनास्थळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाल्यानंतर त्यांनी धडक देणाऱ्या दुचाकीवरील एकाला ताब्यात घेतले होते.

Web Title: An elderly man crossing the road was hit by a speeding two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.