कोल्हे हिल्स परिसरात वृध्दाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 20:46 IST2020-07-04T20:46:36+5:302020-07-04T20:46:50+5:30
जळगाव : कोल्हे हिल्स परिसरातील विहिरीत उडी घेऊन लक्ष्मण धोंडू सोनवणे (६२, रा.लक्ष्मी नगर) यांनी आत्महत्या केल्याच घटना शनिवारी ...

कोल्हे हिल्स परिसरात वृध्दाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
जळगाव : कोल्हे हिल्स परिसरातील विहिरीत उडी घेऊन लक्ष्मण धोंडू सोनवणे (६२, रा.लक्ष्मी नगर) यांनी आत्महत्या केल्याच घटना शनिवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, मात्र सोनवणे हे मनोरुग्ण होते. त्यांच्यावर डॉक्टरांचे उपचार सुरु होते. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोनवणे हे यावल तालुक्यातील बामणोद येथील मुळ रहिवाशी होते. दोन मुले व पत्नी तसेच नातवंड, सुना या कुटुंबासह शहरात वास्तव्यास होते. शनिवारी सकाळी ७ वाजता ते घराच्या बाहेर पडले. बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने पत्नी शोभा यांनी मुलगा सागर यास वडिलांचा शोध घेण्यास सांगितले. सागर हा परिसरात वडीलांचा शोध घेत असतांना एका तरुणाने त्याला याच परिसरात जाणता राजा शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या विहिरीत एक नागरिकाचा मृतेदह असल्याची माहिती दिली. सागरसह कुटुंबियांनी विहिरीकडे धाव घेतली असता विहिरीत पडलेले व्यक्ती हे लक्ष्मण सोनवणे असल्याचे समोर आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचणी येत होत्या. चार तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. सोनवणे यांची सागर व सचिन ही दोन्ही मुले कंपनीत कामाला आहेत.