ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 15:19 IST2020-04-13T15:15:04+5:302020-04-13T15:19:07+5:30
कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था असलेली शेतीची नाळ संकटात आहे.

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली
जामनेर, जि.जळगाव : कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था असलेली शेतीची नाळ संकटात असून शेतात उत्पादन आहे. परंतु व्यापारी व खरेदीदार नाहीत. शेतीतील उत्पादनाचे भाव कवडीमोल झाले आहेत. शेतकऱ्यांना आता आडतेही उचल देत नसून शेतकरी, मजुरांसमोर आर्थिक टंचाईचे आव्हान उभे राहिले आहे.
तालुक्यात रब्बीचा मोठ्या प्रमाणावर पेरा होतो. त्यामध्ये मका, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, भाजीपाला आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असून रब्बीचा उत्पन्न घेतला जातो. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा शेती मानली जाते. शेतीच्या उलाढालीवर शेतकरी, मजुरांचे आर्थिक नियोजन असते. २१ मार्चपासून लॉकडाउनमुळे सर्व काही थांबलेले आहे. यात शेतकऱ्यांचे संकट वाढले. शेतातील भाजीपाला काढून विक्रीला नेने, गहू, ज्वारी, मका, काढणे सुरू होते. मात्र लॉकडाऊनमुळे शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, व्यापारी नसल्याने शेतीमालाचे भाव हे कवडीमोल झाले आहे. गहू, हरभरा, मका, ज्वारी यांचा हंगाम आता सुरू असून, भाव नसल्याने मात्र घरात माल पडून आहेत. तसेच कपाशीसुद्धा अजून शेतकºयांच्या घरात पडली आहे. सध्या या मालांना कोणी व्यापारी घेत नसल्याने शेतकºयासमोर अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तसेच तालुक्यात मनरेगाचे एकही काम सुरू नसल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
यावर्षी विहिरींना पाणी बºयापैकी असल्याने रब्बीची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र लॉकडाऊनमुळे शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, व्यापारी माल घेत नसल्याने शेतीमालाचे भाव कवडीमोल झाले आहे. घरातच माल पडून आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
-शांताराम जाधव, शेतकरी, तळेगाव, ता.जामनेर