जळगाव जिल्ह्यातील धानोरा येथे प्रौढाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 21:21 IST2018-01-23T21:17:28+5:302018-01-23T21:21:42+5:30
शरीरावर जखमा आढळून आल्याने नातेवाईकांनी व्यक्त केला घातापाताचा संशय

जळगाव जिल्ह्यातील धानोरा येथे प्रौढाचा संशयास्पद मृत्यू
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२३ : तालुक्यातील धानोरा बु. येथे ज्ञानेश्वर दशरथ पारधी (वय ४५) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मंगळवारी गावाच्या बाहेर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्याला व तोंडाला मार लागला आहे. तसेच हाताचीही त्वचा निघालेली आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ज्ञानेश्वर पारधी हे वृध्द आईसोबत धानोरा येथे राहत होते. पत्नी शारदा व ४ मुले नाशिक येथे राहतात. ज्ञानेश्वर यांना दारुचे व्यसन होते. दोन दिवसापासून ते घराबाहेर होते. मंगळवारी सकाळी गावाबाहेर त्यांचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणापासून काही अंतरावर गावठी दारुची भट्टी आहे. काही अंतरावर कमरेचा पट्टा व टमरेल होते. त्यांच्या शरीरावरील जखमा पाहता नातेवाईकांना हा प्रकार घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान, तालुका पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन बागुल, मगन मराठे, पोपट सोनार व साहेबराव पाटील यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला आहे.