योगेश्वर नगरातून डंपरची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:20 IST2021-03-25T23:20:04+5:302021-03-25T23:20:21+5:30

जळगाव : कालंका माता मंदिर रस्त्यावरील योगेश्वर नगरात घरासमोर पार्किंग केलेले दहा लाख रुपये किंमतीचे डंपर (क्र. एम.एच१९ झेड.९९१२) ...

Dumper stolen from Yogeshwar city | योगेश्वर नगरातून डंपरची चोरी

योगेश्वर नगरातून डंपरची चोरी


जळगाव : कालंका माता मंदिर रस्त्यावरील योगेश्वर नगरात घरासमोर पार्किंग केलेले दहा लाख रुपये किंमतीचे डंपर (क्र. एम.एच१९ झेड.९९१२) चोरी झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. दिलीप शामलाल पुरोहित (रा. योगेश्वर नगर) यांनी चोरीची फिर्याद दिली आहे.
राजेंद्र देवगिरी गोसावी,मोहन देवगिरी गोसावी व गौरव राजेंद्र गोसावी (सर्व रा.वेंकटेश नगर) यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास हवालदार परिष जाधव करीत आहे.गोसावी परिवार वाळू व्यावसायिक व कंत्राटदार असून पुरोहित व गोसावी यांच्यात असलेल्या आर्थिक व्यवहारातून वाद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यात आता हे नवीन प्रकरण पुढे आले आहे. याबाबत सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात असून सत्यता पडताळली जात असल्याचे तपासी अंमलदार परिष जाधव यांनी सांगितले.

Web Title: Dumper stolen from Yogeshwar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.