सोनबर्डी येथे विज तार तुटल्याने म्हैस मृत्यूमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:39 IST2019-02-19T22:39:41+5:302019-02-19T22:39:55+5:30
एरंडोल : तालुक्यातील सोनबर्डी येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विजेच्या तारा तुटून त्या म्हशीवर पडल्याने म्हैस जागीच ठार ...

सोनबर्डी येथे विज तार तुटल्याने म्हैस मृत्यूमुखी
एरंडोल : तालुक्यातील सोनबर्डी येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विजेच्या तारा तुटून त्या म्हशीवर पडल्याने म्हैस जागीच ठार झाली.
कपूरचंद गंभीर पवार यांच्या मालकीची म्हैस बांदलेली असताना अचानक विजेच्या तारा तुटल्या. या तारा थेट म्हशीच्या अंगावर पडल्या. वीज प्रवाहामुळे म्हैस जागीच गतप्राण झाली. यामध्ये पवार यांचे मोठे नुकसान झाले आहे.