शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

लॉकडाऊनमुळे दीड लाख हेक्टरवर रब्बी हंगाम कापणी-विक्री रखडत रखडतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 15:50 IST

अडीच लाख हेक्टरपैकी शिल्लक दिड लाख हेक्टरवरील ज्वारी, दादर, मका, गहू या धान्यवर्गीय व हरभरा आदी डाळवर्गीय पिकांची कापणी पुरेशा मजुरांअभावी व विक्री कृउबा समित्या बंद-चालूमुळे रखडत रखडतच सुरू आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनला महिना झाल्यानंतरचे चित्रविक्री कृउबा समित्या बंद-चालूमुळे रखडत रखडतच

संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : लॉकडाऊन काळात नेमका जिल्ह्यातील रब्बी हंगाम ऐन कापणीला आला. जवळजवळ अडीच लाख हेक्टरपैकी शिल्लक दिड लाख हेक्टरवरील ज्वारी, दादर, मका, गहू या धान्यवर्गीय व हरभरा आदी डाळवर्गीय पिकांची कापणी पुरेशा मजुरांअभावी व विक्री कृउबा समित्या बंद-चालूमुळे रखडत रखडतच सुरू आहे. याशिवाय शेतमालाचा हमीभाव व प्रत्यक्ष शेतक-यांना मिळणारा भाव यात ५०० ते १००० रु.ची तफावत असल्याने याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.कापणीच्या दिवसात हजारोने जिल्ह्यात येणारा सातपुडा, मध्य प्रदेशातील मजुर लॉकडाऊनमुळे तिकडेच अडकून पडला आहे ते स्थानिक मजूर ज्वारी-बाजरी कापणार की मका कणसे खुडणार? या द्वंद्वात सापडले आहेत. यात धान्य जमिनीवर गळून पडण्याची चिंता व्यक्त होतेय. कापणी-खुडणीचे दर एकरी ४५०० हजारावरुन ६-७ हजारावर गेले आहेत. लॉकडाऊनमुळे स्थानिक मजुरांना वाढत्या तापमानात पायातील चप्पल, अंगावरील कपडे विकत घेण्याची व्यवस्था नसल्याने, कापणीच्या हंगामात या छोट्या-छोट्या गोष्टी अडचणीच्या ठरत आहे. वाढत्या तापमानामुळे पीक कापणीला मर्यादा पडत आहेत. लॉकडाऊनमध्ये इतर उद्योगधंदे बंद असताना कृषी क्षेत्रात मोठा रोजगार उपलब्ध असताना याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका या प्रमुख पिकांमधे हरभरा वगळता इतर धान्याची शासकीय खरेदी नाही. शिवाय हमीभाव तर मिळतच नाही. चाळीसगावसारख्या कृऊबा समित्या लॉकडाऊन काळात बंदच तर अमळनेर, पाचोरा, पारोळा, धरणगाव कृऊबा समित्या बंद-चालू अशी विक्री व्यवस्था आहे. यामुळे धान्य तुंबत आहे. काही मध्यवर्ती गावातून धान्याची खेडा खरेदी सुरू आहे. लॉकडाऊन काळात खेडा खरेदी हा पर्याय चांगला ठरतो. मात्र भाव कमी दिला जातो. शिवाय पेमेंट ८-१० दिवसांच्या उधारीवर आहे.चारा बेभावमागील दुष्काळात ज्वारी कडबा मिळत नव्हता. आहे तो ३५०० ते ५००० रु. शेकडा विकला गेला. यावेळेस ५०० रुपये शेकडा इतका खाली आला आहे. मका, बाजरी चारा तर कुणीही विचारत नसल्याची स्थिती लॉकडाऊन काळातील ‘जिल्हाबंदी’मुळे झाली आहे.केळीला व्यापारी देईल तो भाव, कपाशी घरातमागील वर्षी केळीला या दिवसात एक हजार ते दीड हजारांचा दर क्विंटल मागे मिळाला. आता व्यापारी देईल त्या पडेल भावात केळी विकली जात आहे. २०० ते २५० रुपये क्विंटल भाव तरी कापण्यासाठी धडपड सुरू आहे. टरबूज, भाजीपाला याची एकतर थेट विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे किंवा ते पीक सोडून द्यावे लागत आहे. आजही चाळीस टक्के कापूस विक्रीअभावी शेतकºयांच्या घरात पडून आहे. खेडा खरेदी बंदच आहे. शासकीय कापूस खरेदी थंड बस्त्यात आहे.खरीप तोडांवर आलाय. पीककर्जाचे नाव नाही. आहे त्या शेतमालाची कापणी- विक्री वांध्यात आहे. शेतमजुरांना शासनाकडून धान्य मिळालेय. आता मीठ-मिरची पुरताच कमवा अशी त्यांची धारणा झालीय. शेतकरी हा शासन व शेतमजुराच्या कात्रीत सापडल्याची स्थिती लॉकडाऊन काळातील एक महिन्यात आहे.लॉकडाऊन काळात पिकांच्या कापणीची समस्या सार्वत्रिक आहे. शासनाने रोजगार हमीतून मजुरांना ही कामे लावावीत. याशिवाय रब्बी पिकांची हमीभावाने शासकीय खरेदी केली तरच शेतकरी वाचेल. पीककर्जा तत्काळ मिळण्याची व्यवस्था करावी. ग्रा.पं.नीदेखील तसा ठराव करुन शासनाला पाठवावेत.-विजय जावंदीया, शेती अभ्यासक व संघटना नेतेभाजीपाला, फळे थेट विक्रीसाठी शेतकºयांना कृषी खात्यांतर्गंत पास दिला जात आहे. याशिवाय कृषी केंद्रधारक, ठिबक साहित्य आदी विक्रीधारकांनादेखील तसा पास दिला जात आहे.-बी.बी.गोराडे, तालुका कृषी अधिकारी, भडगाव

टॅग्स :FarmerशेतकरीBhadgaon भडगाव