शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

पावसाअभावी ‘जलयुक्त’ही यंदा निरूपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 10:31 PM

जळके येथील स्थिती

ठळक मुद्दे पुरेसा पाऊस झाल्यास विविध बांधांमधील पाणी पुरते एप्रिलपर्यंत गुरांसाठी पाणी मिळविण्याकरीता विहिर मालकाच्या शेतात मजुरी

सुशील देवकरजळगाव : तालुक्यातील जळके येथे लोकसहभागातून तसेच शासनाकडूनही जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तीन वर्षांपूर्वीच लहान-मोठे ११ बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र मागीलवर्षी या परिसरात पुरेसा पाऊसच न झाल्याने बोढरे धरणातून दरवर्षी ओव्हर-फ्लो होऊन येणारे पाणी आलेच नाही. त्यामुळे हे सर्वच बांध कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेद्वारे टंचाईशी लढा देण्याची घोषणाही जळके परिसरात पाऊसच न झाल्याने निरूपयोगी ठरली आहे.लोकसहभागातून झाले होते कामआर्ट आॅफ लिव्हिंग, जैन इरिगेशनचे गांधी रिसर्च फाऊंडेशन व लोकवर्गणीतून बोढरे नाल्यावर (नदीवर) जलयुक्त शिवार योजनेचे काम मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. जैन इरिगेशनने ४५ दिवस पोकलॅण्ड मशीन मोफत दिले. तर आर्ट आॅफ लिव्हींगने डिझेलसाठी ५० हजार रूपये दिले. तसेच ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून बोढरे नाल्यावर (नदीवर) ९, तसेच गलाटी नाल्यावर २ असे ११ लहान मोठे बंधारे बांधले होते. तसेच त्याच्या दुसऱ्या वर्षीही या बंधाºयांचा गाळ काढून खोलीकरणाचे काम करण्यात आले होते. २०१५ व १६ असे दोन वर्ष जोरदार पाऊस झाल्याने सर्व बंधारे पाण्याने भरले होते. त्यामुळे विहिरींना भरपूर पाणी होते. तसेच पाण्याची टंचाई जाणवली नव्हती. गुरांसाठी पाण्याची टंचाई जाणवली नव्हती. मात्र मागील वर्षी व यंदाही हे बंधारे कोरडेठाकच राहिल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. खाजगी विहिरींवरून पाणी भरावे लागत आहे.मुख्यमंत्र्यांनी दिली होती भेटजलयुक्त शिवार योजनेंतर्गत जळके येथे लोकसहभागातून नाला खोलीकरण व बंधाºयाचे काम करण्यात आले होते. बोढरी नदीवर दोन बंधारे लोकसहभागातून करण्यात आले होते. त्याचे जलपूजन २० जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. २०१६ मध्येही या बंधाºयांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाला होता. मात्र त्यानंतर २०१७ मध्ये पुरेसा पाऊसच न झाल्याने बोढरे धरण ओव्हर-फ्लो न झाल्याने या बंधाºयांमध्ये पाणीसाठाच झालेला नाही. त्यामुळे हे बंधारे कोरडेठाक पडले आहेत.कोल्हापूर बंधारा दुरूस्तीकडे दूर्लक्षबोढरे नाल्यावरच कोल्हापूर पद्धतीचा बंधाराही १०-१२ वर्षांपूर्वी बांधला होता. २०१३-१४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तो फुटला असून गळती लागली आहे. त्याची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. मात्र त्याकडेही प्रशासनाचे दूर्लक्ष होत आहे. आता जलयुक्त शिवार योजनेच्या निधीतूनच त्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र अद्यापही कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे काम या वर्षी पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे शक्यच नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयात जोरदार पाऊस झाला तरीही पाणी साठणे शक्य नाही.बागायती क्षेत्रावर परिणामजळके परिसरात जलयुक्त शिवार योजनेच्या बंधाºयांमध्ये पाणी साठल्यानंतर बागायती क्षेत्रात दुप्पट वाढ झाली होती. दोन वर्षांपासून पाऊस नसल्याने पाणीसाठाच न झाल्याने यावर विपरित परिणाम झाला आहे.