जळगावात भांडण सोडविल्याच्या रागातून टाकला डोक्यात दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 17:32 IST2018-02-19T17:30:48+5:302018-02-19T17:32:08+5:30
भांडण सोडविले म्हणून सनी जाधव उर्फ फौजी याने एकनाथ सुरेश गायकवाड (रा.३० मेहरुण, जळगाव) याच्या डोक्यात दगड टाकून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री मेहरुणमधील स्वामी समर्थ चौकात घडली.

जळगावात भांडण सोडविल्याच्या रागातून टाकला डोक्यात दगड
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१९ : भांडण सोडविले म्हणून सनी जाधव उर्फ फौजी याने एकनाथ सुरेश गायकवाड (रा.३० मेहरुण, जळगाव) याच्या डोक्यात दगड टाकून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री मेहरुणमधील स्वामी समर्थ चौकात घडली.
सनी जाधव याचा विशाल अडकमोल याच्यासोबत वाद झाला होता. एकनाथ गायकवाड याने हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला होता. याचा राग आल्याने सनी जाधव याने एकनाथ गायकवाड याच्या डोक्यात दगड टाकून जखमी केले. याप्रकरणी सनी जाधव व पवन मुकूंदा सोनवणे उर्फ घातक (दोन्ही रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अडकमोल व सनी या दोघांचे भांडण सुरु असताना एकनाथ याने मध्यस्थी करुन ते सोडविण्याचा प्रयत्न केला होता.