जळगावात विजेच्या अतिदाबामुळे टिव्ही, फ्रीज खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:11 IST2018-08-16T20:09:43+5:302018-08-16T20:11:43+5:30
घरातील विजेचा प्रवाह सुरळीत सुरु असतांना, अचानक अतिदाबाचा विद्युत पुरवठा वाढुन, झालेल्या शॉर्टसक्रीटमुळे घरातील टिव्ही, फ्रीज जळून गेल्याची घटना स्वातंत्र्य चौकातील परिसरामध्ये १५ आॅगस्ट रोजी दुपारी घडली.

जळगावात विजेच्या अतिदाबामुळे टिव्ही, फ्रीज खाक
जळगाव : घरातील विजेचा प्रवाह सुरळीत सुरु असतांना, अचानक अतिदाबाचा विद्युत पुरवठा वाढुन, झालेल्या शॉर्टसक्रीटमुळे घरातील टिव्ही, फ्रीज जळून गेल्याची घटना स्वातंत्र्य चौकातील परिसरामध्ये १५ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. यामध्ये अथर्व हॉस्पीटलमधील ५० हजार रुपये किंमतीचे दोन मॉनीटरदेखील जळून खाक झाले आहेत.
स्वातंत्र्य चौकातील रहिवासी भागामध्ये १५ रोजी दुपारी घरातील विद्युत पुरवठ्याचा अचानक दाब वाढून, या दाबामुळे परिसरातील नागरिकांचे घरातील टिव्ही, फ्रीज, लाईट व इतर उपकरणे जळून खाक झाली आहेत. एकाच वेळेस या परिसरातील सर्व घरातील अतिउच्च दाबाचा वीज पुरवठा वाढून महागड्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या भागातीलच अथर्व हॉस्पीटलमधील ५० हजार रुपये किमतीचे आयसीयूमधील मॉनीटर नावाचे उपकरणही जळून खाक झाले . तसेच महावितरणने आमच्या उपकरणांची भरपाई देण्याचींही मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.