शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

जळगावात मद्यधुंद तरुणाने घेतला नगरसेवकाला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:57 PM

जिल्हा रुग्णालयात उपचार

जळगाव : भावाची भेट घेऊन घरी जात असताना नगरसवेक पृथ्वीराज सोनवणे (रा़ आदर्शनगर) यांच्याशी एका मद्यपी तरूणाने वाद घालत हाताला चावा घेतल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता घडली़ यात त्यांच्या हाताला दुखापत झाली असून जिल्हा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले़आदर्शनगरातील रहिवासी पृथ्वीराज सोनवणे हे पत्नीसह सायंकाळी आदर्शनगरातील लायन्स हॉलजवळ राहत असलेले त्यांचे भाऊ शरद सोनवणे यांच्याकडे आले होते़ रात्री ९ वाजता ते घरी जाण्यासाठी त्यांच्या दुचाकीजवळ आले़ त्यावेळी त्यांच्या पत्नी तसेच त्यांचे भाऊ देखील घराबाहेर आले़याचवेळी त्या ठिकाणी एक मद्यपी तरूण आला़ त्याने पृथ्वीराज सोनवणे यांच्याशी कारण नसताना वाद घातला़ हा प्रकार शरद सोनवणे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या तरूणाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला़ परंतू, त्याने चक्क शरद सोनवणे यांची कॉलर पकडून आणखी वाद घातला़ यानंतर पृथ्वीराज सोनवणे यांनी त्याची पुन्हा समजूत घालण्याचा प्रयत्न केला़ परंतू, एकही ऐकून न घेता तो तरूण नगरसेवक सोनवणे यांच्या अंगावर धाऊन आला़ अन् त्याने त्यांच्या डाव्या हाताला चावा घेतला़ यात त्यांच्या हाताला ईजा झाली़ त्यानंतर तो तरूण त्या ठिकाणाहून पसार झाला़ हा प्रकार घडल्यानंतर सोनवणे यांनी त्वरीत रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठले़ परंतू, हाताला दुखापत झाली असल्यामुळे त्यांना पोलिसांनी आधी उपचार घेण्याबाबत सल्ला दिला़ त्यांनी त्वरीत जिल्हा रूग्णालयात जाऊन उपचार घेतले़दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाजवळ तरुणांनी गोंधळ घातला होता. आता पुन्हा एका तरुणाने चक्क नगरसेवकाला चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे.सोनवणे यांनी या मद्यपीवर कारवाई करण्याची मागणी रामानंद नगर पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी या मद्यपीचा शोध घेतला मात्र तो अद्याप सापडलेला नाही.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव