रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.रेखा महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 20:45 IST2020-07-02T20:45:01+5:302020-07-02T20:45:27+5:30

जळगाव : रोटरी क्लब आॅफ जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.रेखा महाजन यांची तर मानद सचिवपदी शशी अग्रवाल यांची निवड करण्यात ...

Dr. Rekha Mahajan is the President of Rotary Midtown | रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.रेखा महाजन

रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.रेखा महाजन

जळगाव : रोटरी क्लब आॅफ जळगाव मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ.रेखा महाजन यांची तर मानद सचिवपदी शशी अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.


रोटरीत डॉ.रेखा महाजन गेल्या २० वषार्पासून डॉ. रेखा महाजन रोटरीत सक्रीय असून त्यांनी विविध कमिटींच्या चेअरमन पदासह उपाध्यक्ष व प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून कार्य केले आहे. आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात गेल्या १८ वर्षांपासून त्या कार्यरत आहेत. आर्यन इको रिसोर्टच्या संचालिका असून रोटरी मिडटाऊनचे माजी अध्यक्ष डॉ. रवी महाजन यांच्या त्या पत्नी आहेत. मानद सचिवपदी निवड झालेल्या शशी अग्रवाल यांनी रोटरी मिडटाऊन मध्ये महिला समिती प्रमुख पदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. एस.के.आॅईल मिलच्या त्या संचालिका आहेत.

अशी आहे कार्यकारिणी
नूतन अध्यक्ष डॉ. महाजन यांनी घोषित केलेल्या कार्यकारिणीत प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.विवेक वडजीकर,आयपीपी डॉ. उषा शर्मा, उपाध्यक्ष मनोज पाटील, सहसचिव संजय सिंग, कोषाध्यक्ष विनोद मल्हारा, कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून डॉ.के.सी.पाटील, दिलीप गांधी, अनिल एम.अग्रवाल, किशोर सुर्यवंशी, अनिल डी. अग्रवाल, शंकरलाल पटेल, डॉ. अपर्णा मकासरे, डॉ.अभिनय हरणखेडकर, डॉ. रवी महाजन, रमेश जाजू, तर सल्लागार म्हणून आनंद खांबेटे, डॉ. सुमन लोढा, संजय पाटील आदींचा समावेश आहे.

 

 

 

Web Title: Dr. Rekha Mahajan is the President of Rotary Midtown