अमळनेरच्या डॉ.मंजिरी कुलकर्णी अ.भा.लायनेस क्लबच्या अध्यक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:02 IST2020-02-03T00:01:49+5:302020-02-03T00:02:29+5:30
डॉ.मंजिरी कुलकर्णी यांची अखिल भारतीय लायनेस क्लबच्या अध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड झाली.

अमळनेरच्या डॉ.मंजिरी कुलकर्णी अ.भा.लायनेस क्लबच्या अध्यक्षा
अमळनेर, जि.जळगाव : येथील डॉ.मंजिरी कुलकर्णी यांची अखिल भारतीय लायनेस क्लबच्या अध्यक्षा म्हणून बिनविरोध निवड झाली. ग्वाल्हेर येथे रविवारी २६ राज्यातील ८०० डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटस यांच्या उपस्थितीत शानदार समारंभात हा निर्णय झाला.
अमळनेर सारख्या आडवळणाच्या छोट्या गावाला प्रथमच इतका मोठा बहुमान मिळाला आहे फ. डॉ.मंजिरी कुलकर्णी यावेळी म्हणाल्या की, मधुमेहाविरुद्ध खूप मोठी लढाई छेडणे आणि मधुमेहाबद्दल व्यापक जनजागर करणे फ, क्लबची सदस्य संख्या वाढविणे हे माझे मुख्य लक्ष्य असेल.
डॉ.कुलकर्णी यापूर्वी लायनेस क्लबच्या मल्टिपल चेअरमन होत्या, तर त्यांचे पती डॉ.रवींद्र कुलकर्णी हेही लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल आहेत. इतके मोठे बहुमान प्राप्त केलेले हे एकमेव दाम्पत्य आहे, हे विशेष. हे दाम्पत्य अमळनेर येथेच वैद्यकीय सेवा करतात. मात्र खूप वेळ ते लायनिझमच्या सेवेत व्यतीत करतात.
दरम्यान, डॉ. मंजिरी कुलकर्णी यांच्या या निवडीबद्दल अमळनेरसह राज्याच्या लायन्स परिवारात आनंदाचे वातावरण आहे.