डॉ.गजभिये जळगावच्या नव्या अधिष्ठाता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 20:14 IST2020-05-22T20:14:22+5:302020-05-22T20:14:34+5:30
बदली : डॉ़ खैरे यांच्या जागेवर नियुक्ती

डॉ.गजभिये जळगावच्या नव्या अधिष्ठाता
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांच्या जागेवर कोल्हापूर शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगावात नियमित अधिष्ठातांची नियुक्ती करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविल्यानुसार वैद्यकीय शिक्षण संचालयाने शुक्रवारी यासंदर्भात आदेश काढले आहे.
जळगावात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाटएत असून या रुग्णांवर तात्काळ उपचारांसाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियमित अधिष्ठाता नियुक्त करावा, असे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला कळविले होते.