शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपाच्या तिजोरीच्या चाव्या डॉ.चंद्रशेखर पाटलांकडे, महिला बालकल्याण सभापतीपदी सिंधू कोल्हेंना‌ संधी, उद्या अधिकृत घोषणा

By सुनील पाटील | Updated: February 26, 2026 15:39 IST

Jalgaon Municipal Corporation News: महापालिकेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत.

- सुनील पाटीलजळगाव - महापालिकेच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत. सोबतच, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शिंदे सेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका सिंधू कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे.गुरुवारी दुपारी नगरसचिव सतीश शुक्ला यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी तीन, तर सिंधू कोल्हे यांनी दोन अर्ज सादर केले.

महापालिकेत महापौरपदानंतर सर्वात महत्त्वाचे स्थायी समितीचे सभापती पद असते. या पदावर कोण विराजमान होणार याकडे लक्ष लागून होते. महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर नितीन लढ्ढा यांचेही नाव चर्चेत होते. भाजपने गुरुवारी डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. नगरसचिव शुक्ला यांच्याकडे पाटील यांनी तीन तर महिला व बालकल्याण सभापती पदासाठी सिंधू कोल्हे यांनी दोन अर्ज दाखल केले. यावेळी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, शिंदे सेनेचे गटनेते विष्णू भंगाळे, नितीन बरडे, नितीन लढ्ढा, दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, नरेंद्र पाटील, गणेश सोनवणे, डॉ.अमृता सोनवणे, प्रतिभा देशमुख, गायत्री राणे, सुरेखा तायडे आदी उपस्थित होते.

आज विशेष सभेत अधिकृत घोषणादोन्ही सभापती निवडीसाठी आज २७ रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.‌ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल पिठासीन अधिकारी असतील. या सभेत दोन्ही नवनियुक्त सभापतींच्या नावांची औपचारिक घोषणा केली जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalgaon Municipal Corporation Gets New Finance and Women & Child Welfare Heads

Web Summary : Dr. Chandrashekhar Patil now controls Jalgaon's finances. Sindhu Kolhe leads Women & Child Welfare. Official announcement today.
टॅग्स :Jalgaon Municipal Corporation Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Jalgaonजळगाव