इंडियन डेंटल असोसिएशनवर डॉ.अमोल जाधव यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 14:41 IST2019-01-29T14:40:30+5:302019-01-29T14:41:25+5:30
इंडियन डेंटल असोसिएशनच्या धुळे शाखेच्या अध्यक्षपदी पाचोरा येथील प्रख्यात दंतरोगतज्ज्ञ डॉ.अमोल जाधव यांची निवड करण्यात आली.

इंडियन डेंटल असोसिएशनवर डॉ.अमोल जाधव यांची निवड
ठळक मुद्देधुळे शाखेच्या अध्यक्षपदी झाली निवडपाचोरा येथे झाला सत्कार
पाचोरा, जि.जळगाव : इंडियन डेंटल असोसिएशनच्या धुळे शाखेच्या अध्यक्षपदी पाचोरा येथील प्रख्यात दंतरोगतज्ज्ञ डॉ.अमोल जाधव यांची निवड करण्यात आली.
नुकत्याच धुळे येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अशोक ढोबळे, डॉ.सुरेश मेश्राम, महाराष्ट्र राज्य इंडियन डेंटल असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सन २०१९ करीता पाचोरा येथील अमोल जाधव यांची अध्यक्षपदी, तर डॉ.समीर देवरे यांची सचिवपदी निवड झाली. यावेळी डेंटल असोसिएशनतर्फे जनहीतार्थ राबवित असलेल्या कार्याचा आढावा घेतला. डॉ.जाधव यांच्या निवडीबद्दल पाचोऱ्यात सत्कार करण्यात आला.