शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

‘डिपीडीसी’त अधिकारी फैलावर दुसरीकडे वाळू माफिया गिरणेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 1:02 PM

अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष : गिरणा पुलानजीक भरली वाळू वाहतूक करणाºया वाहनांची जत्रा

जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाळू प्रश्नावर वातावरण गरम असताना त्याचवेळी दुसरीकडे वाळू माफिया गिरणा नदीत वाळूची तस्करी करण्यात मग्न असल्याचे चित्र सोमवारी जाणवले.ग्रामस्थ व प्रसारमाध्यमांनी गिरणा नदीत सुरु असलेल्या वाळू उपश्याबाबत प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर गेल्या आठवड्यात प्रशासनाने कारवाई केली. मात्र, ही कारवाई केवळ दिखावा होता, कारण कारवाईला आठवडा उलटत नाही तोच गिरणा नदीपात्रात वाळू माफियांनी हैदोस घातला. सोमवारी बांभोरी येथील गिरणा नदीपात्रात वाळू माफियांची अक्षरश जत्रा भरल्याचे चित्र होते.सोमवारी महसूलचे सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसीच्या बैठकीत व्यस्त असताना दुसरीकडे गिरणा नदी पात्रात वाळू माफियांकडून नदीचे अक्षरश लचके तोडण्याचे काम सुरु होते. विशेष म्हणजे आमदार संजय सावकारे यांनी तर जिल्हाधिकाऱ्यांचेच अधिकारी ऐकत नसल्याचे सांगून प्रशासनातील वस्तूस्थिती सर्वांच्या समोर ्रआणली.जबाबदारी झटकून ग्रा.पं.वर वाळू चोरी रोखण्याची जबाबदारीशुक्रवारी महसूल विभागाच्या झालेल्या बैठकीत वाळू चोरी रोखण्याचे काम आता ग्राम पंचायतीवर सोपविले आहे. महसूल प्रशासनाकडून केवळ जबाबदारी झटकण्याचे काम सुरु आहे. ग्रामपंचायतीवर जबाबदारी सोपविली तर महसूल विभाग कारवाई करणार नाही का? वाळू चोरीत महसूलसह कोणत्या यंत्रणेचा सहभाग आहे, याची नेहमीच ओरड झाली आहे. काही ठिकाणी तर ग्रामपंचायतच ठराव देत नसल्याची स्थिती आहे.‘गिरणा’ पोखरल्यानंतर आता ‘तापी’ ला केले जातेय लक्ष्यनागझिरीपासून ते गाढोदापर्यंतच्या गिरणा नदीच्या ४५ किमीच्या पट्टयात वाळू माफियांनी अक्षरश हैदोस माजवून नदी पोखरून टाकली आहे. अनेक ठिकाणी तर वाळू पुर्णपणे संपल्यानंतर नदीपात्रात खडक दिसायला लागले आहेत. गिरणा नदी पोखरल्यानंतर आता वाळू माफियांनी आपली नजर तापी नदीकडे फिरवली आहे. विदगाव, सावखेडा, किनोद, कठोरा, भादली, भोकर व चोपडा तालुक्यातील खेडी-भोकरी या भागातील तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु झाला आहे. मात्र, महसूल प्रशासनाने वाळू माफियांसोबतच मिलीभगत असल्याने आता वाळूमाफियांना कारवाईची भिती राहिलेली नाही.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव