‘मी पुन्हा येणार’ असे म्हणणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 11:58 IST2020-01-13T11:57:50+5:302020-01-13T11:58:09+5:30

मंदाकिनी खडसे : दूध संघात पुन्हा संधीची मात्र इच्छा

 Don't say 'I'll come again' | ‘मी पुन्हा येणार’ असे म्हणणार नाही

‘मी पुन्हा येणार’ असे म्हणणार नाही

भुसावळ : 'मी पुन्हा येणार' असे मी म्हणणार नाही.. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता त्यांच्या विधानाची खिल्ली जिल्हा दूध फेडरेशनच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी येथे उडवली.
येथील वांजोळा रोडवर कीर्तन महोत्सवाची सांगता व सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, मला दुध फेडरेशन मध्ये पुन्हा संधी मिळावी, अशी माझी इच्छा आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप झाला. मात्र मला लोकांसाठी काम करावेसे वाटत होते , असे मत मंदाकिनी खडसे यांनी व्यक्त केले.
भुसावळ येथील नगरपालिकेचे काम चांगले आहे. मात्र ही कामे जनतेपर्यंत पोहोचण्यात नगराध्यक्ष रमण भोळे कमी पडत असल्याचे मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले आहे. व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक निर्मल कोठारी, प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रजनी सावकारे, पुरुषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन , रमाकांत महाजन , महेश फलक, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, अजय नागराणी, आदी उपस्थित होते.

Web Title:  Don't say 'I'll come again'