लॉकडाऊन संपले तरी लहान मुलांना घराबाहेर सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:15 AM2021-05-16T04:15:10+5:302021-05-16T04:15:10+5:30

डमी स्टार न्यूज क्रमांक : 717 दुसऱ्या लाटेत बालकं गंभीर होण्याचे प्रमाण वाढले : तिसऱ्या लाटेत बालकांना असू शकतो ...

Don't leave children out of the house even after the lockdown is over | लॉकडाऊन संपले तरी लहान मुलांना घराबाहेर सोडू नका

लॉकडाऊन संपले तरी लहान मुलांना घराबाहेर सोडू नका

Next

डमी

स्टार न्यूज क्रमांक : 717

दुसऱ्या लाटेत बालकं गंभीर होण्याचे प्रमाण वाढले : तिसऱ्या लाटेत बालकांना असू शकतो अधिक धोका

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेल्या बालकांचे दुसऱ्या लाटेत मात्र प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण हे जिल्ह्यात २५ ते ३० टक्क्यांवर आले आहेत. पहिल्या लाटेत अगदी पाच ते दहा टक्केच बालकांना लागण झाली होती. मात्र, त्याच्या अगदी विपरीत परिस्थिती दुसऱ्या लाटेत समोर आल्याने तिसऱ्या लाटेत ही परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता अस्ल्याने पालकांनी अशा मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने बेड मॅनेजमेंटबाबत नियोजन सुरू करण्यात आले आहे. यात लहान बालकांसाठी बेड वाढविण्यावर नियोजन करण्यात येत आहेत. गंभीर लहान बालकांवर सद्य:स्थिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार केले जात आहे. या ठिकाणाहून अनेक गंभीर बालकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

लक्षणांमध्ये बदल

पहिल्या लाटेत समोर आलेली बाधित बालके व दुसऱ्या लाटेत समोर आलेल्या बाधित बालकांच्या लक्षणांमध्ये बदल समोर आले आहेत. दुसऱ्या लाटेत काही बालकांना मेंदूज्वर पॅरालिसिस, झटक, पोटात संसर्ग, यासह तपास, दम लागणे, श्वास घ्यायला खूप त्रास होणे अशी गंभीर लक्षणे समोर आली आहेत. कोरोना विषाणूत होणोर जणुकीय बदल यामुळे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले असून आगामी काळात दक्षता घेण्याचे आवाहन बालरोगतज्ञांकडून केले जात आहे.

बेड वाढविण्याचे नियेाजन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सद्या बालकांसाठी स्वतंत्र कक्ष असून नवजात शिशू काळजी कक्ष विभागात गंभीर बालकांसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. आगामी काळात वाढणारी संख्या वाढविण्यात येणार आहे.

यासह तालुकास्तरावरही याचे नियोजन सुरू करण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालयात कशी व्यवस्था करण्यात येईल, याची चाचणी केली जात आहे. जीएमसीत व्हेंटिलेटर वाढविणे, गंभीर बालकांसाठी बेड वाढविणे याचे नियाेजन सुरू आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

दुसऱ्या लाटेतील एकूण रुग्ण : ७६१७८

१८ वर्षाखालील रुग्ण :

शून्य ते १२ वयोगटातील रुग्ण ३५

कोट

दुसऱ्या लाटेत बालके गंभीर होण्याचे प्रामण हे २५ ते ३० टक्के आहे. या लाटेत बालकांमध्ये गंभीर लक्षणे आढळत आहेत. गेल्या लाटेत हे प्रमाण कमी होते. ही परिस्थिती बघता जर प्राथमिक स्तरावरच बालकांचे निदान होऊन शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार औषधोपचार सुरू झाले तर बालकांना गंभीर होण्यापासून वाचवू शकतो, यात जनरल प्रॅक्टिशनर यांनी बालकांना कोरोनाची लक्षणे असल्यास तातडीने तपासणी करण्यास सांगावे व कोविडच्या उपचारासाठी त्याला रेफर करावे - बाळासाहेब सुरोस, बालकरोग विभागप्रमुख, जीएमसी

लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नये, मोठ्यानी काळजी घ्र्यावी,

मोठ्यांनी काळजी घेतली तर लहान बालके सुरक्षित राहतील, त्यांना लक्षणे जाणवल्यास तातडीने तपासणी करून निदान करून घ्यावे. शिवाय मोठ्यांनी लसीकरण करून घ्यावे, जेणेकडून त्यांना धोका कमी राहील व घरातील बालकेही सुरक्षित राहतील. तिसऱ्या लाटेबाबत अद्याप केवळ अंदाजन वर्तविण्यात आहेत. गाईडलाईनस् अद्याप नाहीत- डॉ. मिलिंद बारी, बालरोगतज्ञ

कोरोना विषाणूचा आता सर्वच वयोगटात संसर्ग होत आहे. त्यात लहान बालकेही सुटलेले नाही. मोठ्यांपेक्षा त्यांचे प्रमाण कमी असले तरी ते दुर्लक्षित करण्यासारखे नाही. आगामी काळात संसर्ग वाढल्यास बालकांना धोका होण्याची शक्यता असल्याने याची मोठी जबाबदारी ही पालकांवर राहणार आहे. प्रशासनाने तालुकास्तरावर बालकांसाठी सुक्ष्मनियोजन सुरू केले आहे. शिवाय कोरोनाचा आगामी काळातील संसर्ग रोखण्यासाठी आपण लसीकरणावर अधिक भर दिलास असून त्याचे नियोजन स्थानिक पातळ्यांवर सुरू आहेत. - डॉ. समाधान वाघ, माता व बालसंगोपन अधिकारी

Web Title: Don't leave children out of the house even after the lockdown is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.