शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

घरगुती लाडूला पसंती कायम, थंडीत सुक्यामेव्याचा बाजार गरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:14 IST

तयार लाडूची चव खान्देशी मनाला पसंत पडेना

जळगाव : डिसेंबर महिना उजाडला तरी गायब असलेली थंंडी वाढल्याने सुक्या मेव्याचा बाजार गरम झाला आहे. डिंक, मेथीच्या लाडू तयार करण्यासाठी बाजारात खरेदीसाठी रेलचेल सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, विविध कंपन्या रेडिमेड लाडू तयार करीत असल्या तरी खान्देशी मनाला त्याची चव पटत नसल्याने घरी आई, आजीने केलेल्या लाडूलाच पसंती कायम आहे.थंडीची चाहूल लागताच गृहिणींची लगबग सुरू होते ती डिंकाचे लाडू करण्यासाठी. हिवाळ््यात उत्तम प्रकृतीसाठी हिरव्या पाले-भाज्यांसह आरोग्यवर्धक इतरही पोषक पदार्थ खाण्याकडे कल असतो. त्यामुळे एरव्ही उन्हाळ््यात वर्ज्य असलेल्या गरम पडणाऱ्या व शरीरास उब देणाºया वस्तू हिवाळ््यात आवर्जून सेवन केल्या जातात.सध्या बाजारात डिंक, मेथी व सुकामेव्याचा लाडूच्या साहित्याचा बाजार गरम आहे. सध्याचे धकाधकीचे जीवन पाहता लोणचे व इतर पदार्थांसह तयार (रेडिमेड) लाडूही कंपन्या बनवित आहे. मात्र खान्देशी जीभेला त्याची चव अजूनही पटलेली नसल्याने त्यांना जळगावात मागणी नसल्याचे चित्र आहे.याबाबत दुकानदारांनी सांगितले की, थंडीचे दिवस सुरू झाले की आम्ही लाडूसाठी लागणारे सर्व साहित्य ग्राहकांसाठी उपलब्ध करतो. मात्र तयार लाडूच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्यांना ग्राहकांकडून मागणी नसल्याने ते आम्ही ठेवत नाही.याशिवाय याला दुसरे मोठे कारण आहे, ते म्हणजे खान्देशी माणसाला तयार लाडूची चव पसंत पडलेलीच नाही तसेच त्यामध्ये कोणते साहित्य किती टाकले आहे, याची शाश्वती नसते. घरी केलेल्या लाडूंवरच गृहिणींचा अधिक विश्वास आहे. त्यामुळे ‘होममेड’ लाडूची चवच न्यारी असल्याने खान्देशी जनतेची मानसिकता तरी रेडिमेड लाडूकडे नाही.आपल्याकडे ‘क्वालिटी अ‍ॅव्हरनेस’ वाढत असल्याने त्याच्याशी तडजोड करीत नसल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. दिवसेंदिवस चांगल्या प्रतिच्या मालाची मागणी वाढत असल्याने त्याच मालाचा खप जास्त आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही चांगली बाब असल्याचे व्यापारी सांगत ‘कमी खा, पण चांगले खा’ असा मंत्र व्यापारी देत आहेत. या लाडूंचा ‘सिझन’ तसा काही ठराविक महिन्यात नसून थंडीवर तो अवलंबून असतो. अर्थात नोव्हेबरमध्येच लाडू बनविले जातील असे नाही तर नोव्हेबर महिन्यापासून ज्या वेळी थंडी वाढली त्या वेळी लाडू बनविले जातात. साधारणत: हा काळ असतो नोव्हेबरचा दुसरा आठवडा ते डिसेंबरच्या अखेरचा. त्यानंतर वेधलागतात ते तिळीच्यालाडूचे.धामोडीच्या डिंकाला मागणीहिवाळ्यात आरोग्यासाठी पोषक असलेल्या डिंकाच्या लाडूसाठी धामोडीच्या डिंकाला मोठी मागणी असते. मात्र यंदा उत्पादन कमी आले आहे. त्यामुळे धामोडीच्या डिंकाची टंचाई आहे. अजिंठ्याच्या पर्वतरांगामध्ये धामोडीच्या झाडापासून मोठ्या प्रमाणात डिंकांचे उत्पादन होते. दारोदार विक्रीसाठी येणाºया डिंकाला गृहिणी पसंती देतात. बाजारात यापेक्षाही कमी भावात हे पदार्थ उपलब्ध आहे. मात्र हल्ली ‘क्वालिटी अ‍ॅव्हरनेस’कडे कल असल्याने दर्जानुसार पसंती दिली जात आहे. त्यामुळे बाजारात दर्जानुसार सुक्यामेव्याचे भाव वेगवेगळे आहे.लाडूच्या घटक पदार्थांचे भाव (प्रती किलो)मेथी - ६० ते ९०, मेथी पावडर - १०० ते १४०, आक्रोड - ३५० ते ६००, अंजीर - ८०० ते २०००, जरदाळू - ४०० ते १०००, काजू - ८४० ते १०००, बदाम - ६८० ते ७२०, खोबरं - १८० ते ३००, खारीक - ६० ते १८०, डिंक - २४० ते ४००, गोडंबी - ५५० ते ६५०, किसमिस - ३०० ते ४००, पिस्ता मगज - १७०० ते २०००, सिंगाडा - १६० ते २००, सिंगाडा पीठ - २०० ते २४०.तयार लाडूची क्रेझ आपल्याकडे अजून नाही. खान्देशी माणसाची मानसिकता रेडिमेड लाडू घेण्याकडे नसून सुका मेवा घेऊनच घरी लाडू केले जातात. आम्हीही कमी खा, पण चांगले खा, असेच ग्राहकांना सांगतो.- सुरेश बरडिया, सुकामेवा विक्रेता.

टॅग्स :Jalgaonजळगाव