ऑनलाइन लोकमतचोपडा (जळगाव), दि. 22 - डॉक्टरने उधारीचे बिल मागितल्याच्या कारणावरून, त्यास शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना तालुक्यातील उमर्टी येथे काल घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२१ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास लालचंद शिवदास बोरसे यांनी सुरेश पावरा याच्याकडे वैद्यकीय व्यवसायाचे उधारीचे बिल मागितले. त्याचा राग आल्याने, पावरा याने लालचंद बोरसे यांना शिवीगाळ करून, जीवे ठार मारण्याची धमकी दिली. लालचंद बोरसे यांचे फियार्दीवरून सुरेश भयाला पावरा (रा. उमर्टी) याचे विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}