जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:00+5:302021-08-13T04:20:00+5:30
या स्पर्धेचा विषय ‘मी संशोधक वैज्ञानिक होणारच’ असा होता. या स्पर्धेत एकूण १४५ स्पर्धक सहभागी झाले. सर्व विजेत्यांना आणि ...

जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
या स्पर्धेचा विषय ‘मी संशोधक वैज्ञानिक होणारच’ असा होता. या स्पर्धेत एकूण १४५ स्पर्धक सहभागी झाले. सर्व विजेत्यांना आणि सर्व सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र व्हाॅट्सॲप आणि ई-मेलवर पाठविले जाणार असून, सर्व विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभास यथावकाश आमंत्रित केले जाणार आहे. तिला शाळेतील सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असून, संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही. टी. जोशी, संस्थेचे मानद सचिव महेश देशमुख, शाळेचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका पी. एम. वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. ठाकरे आणि ए. बी. अहिरे, तांत्रिक विभागप्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभागप्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिच्या या यशाबद्दल कौतुक केले आहे.