‘जिथे शाळा, तिथे वृक्ष’ मोहिमेंतर्गत रोपांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST2021-08-01T04:15:38+5:302021-08-01T04:15:38+5:30
पर्यावरणावर दूरगामी सकारात्मक परिणाम करणाऱ्या या उपक्रमाचे भगिनी मंडळ शैक्षणिक संकुल व इनरव्हील क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ...

‘जिथे शाळा, तिथे वृक्ष’ मोहिमेंतर्गत रोपांचे वितरण
पर्यावरणावर दूरगामी सकारात्मक परिणाम करणाऱ्या या उपक्रमाचे भगिनी मंडळ शैक्षणिक संकुल व इनरव्हील क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर भगिनी मंडळ या संस्थेच्या, तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष पूनम गुजराथी, सचिव मीना पोतदार यांच्यासह माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, व्हॉलंटरी स्कूलचे मुख्याध्यापक अरुण संदानशिव, मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक रफिक सैयद, प्रताप विद्यामंदिरातील शिक्षक अतुल भट, पंकज उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक नंदलाल न्हावी उपस्थित होते.
इनरव्हील क्लबतर्फे देण्यात येणाऱ्या रोपांचे ऑडिट केले जाईल. प्रत्येक शाळेने झाडांचे पालकत्व स्वीकारावे. शिक्षकांनी व मुलांनी झाडे दत्तक घ्यावीत, असे कार्यक्रमाच्या अध्यक्षा पूनम गुजराथी यांनी मनोगतात सांगितले.
यावेळी रोपांची निगा राखणारे नितीन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील महिला मंडळ माध्यमिक व प्राथमिक विद्यालय, प्रताप विद्यामंदिर, पंकज उच्च माध्यमिक विद्यालय, विवेकानंद विद्यालय, सद्गुरू कन्या विद्यालय, मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल, हि. मो. करोडपती माध्यमिक विद्यालय, मिमोसा इंग्लिश मीडियम स्कूल, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्युनिसिपल हायस्कूल येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इनरव्हील क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.
याप्रसंगी प्रताप विद्या मंदिराचे अतुल भट, तसेच पंकज उच्च माध्य. विद्यालयाचे नंदलाल न्हावी, सद्गुरू कन्या विद्यालयाचे व्ही. पी. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन भावेश लोहार यांनी, तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील चौधरी यांनी केले. आभार संजय बारी यांनी मानले.