चाळीसगावात रयत सेनेतर्फे दिवाळीनिमित्त फराळ वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 18:08 IST2020-11-13T18:07:49+5:302020-11-13T18:08:26+5:30

घरेलू कामगार महिलांना दिवाळीनिमित्त रयत सेनेच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले.

Distribution of Faral on the occasion of Diwali by Rayat Sena in Chalisgaon | चाळीसगावात रयत सेनेतर्फे दिवाळीनिमित्त फराळ वाटप

चाळीसगावात रयत सेनेतर्फे दिवाळीनिमित्त फराळ वाटप

चाळीसगाव : कोरोना काळात अनेक मजुरांचे काम गेले हाताला काम नसल्यामुळे गोरगरीब कुटुंबाची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून रयत सेनेतर्फे १३ रोजी नागद रोड वस्तीत घरेलू कामगार महिलांना दिवाळीनिमित्त रयत सेनेच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले. यामुळे कामगार महिलांची दिवाळी गोड झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी नागद रोडवरील घरेलू कामगार महिलांची दिवाळी गोड केली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष संता पहेलवान, ह्यूमन राइट्स शहर अध्यक्ष सुमित भोसले, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, तालुका उपाध्यक्ष विलास मराठे, शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष सचिन नागमोती, दीपक देशमुख, उद्देश शिंदे, परमेश्वर सूर्यवंशी उपस्थित होते.

Web Title: Distribution of Faral on the occasion of Diwali by Rayat Sena in Chalisgaon