जळकेतांडा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:16 IST2019-07-18T22:14:30+5:302019-07-18T22:16:08+5:30

जळगाव - तालुक्यातील जळकेतांडा जि़प़ शाळेतील विद्यार्थ्यांना गुरूवारी रोटरी क्लब आॅफ जळगाव सेंट्रलच्यावतीने शैक्षणिक साहित्यांचे किट वाटप करण्यात आले. ...

Distribution of educational material to students of Jalkitanda District School | जळकेतांडा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळकेतांडा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव- तालुक्यातील जळकेतांडा जि़प़ शाळेतील विद्यार्थ्यांना गुरूवारी रोटरी क्लब आॅफ जळगाव सेंट्रलच्यावतीने शैक्षणिक साहित्यांचे किट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आधार पाटील होते़ तर प्रमुख पाहूणे म्हणून राहूल मयूर, सुशील राका, संतोष अग्रवाल, रोशन पगारिया, कल्पेश दोशी, मिलन मेहता आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्याहस्ते जळकेतांडा जि.प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला रोटरीतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुध्दा करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ब्रिजलाल पाटील यांनी केले. याप्रसंगी अजय चुगरा, समीर शहा, प्रशांत महाजन, राजेश चौधरी, रमेश बजाज, विलास देशमुख, भंगू चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण आदी उपस्थित हाते़ कार्यक्रमात प्रतिभा चव्हाण, पायल पवार, सोनाली चव्हाण या विद्यार्थिनींसह ज्ञानेश्वर चव्हाण, सुरेश ढाके, राहुल मयूर, संतोष अग्रवाल, कल्पेश दोशी, रोशन पगारीया यांनी मनोगत व्यक्त केले़ तसेच आभार चावदस लांबोळे यांनी मानले.
 

Web Title: Distribution of educational material to students of Jalkitanda District School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.