पाळधीत किरकोळ कारणावरुन वाद; कारची तोडफोड, दुकाने पेटवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 05:24 IST2025-01-01T05:21:47+5:302025-01-01T05:24:09+5:30
घटनेची तीव्रता पाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. एका भागात दगडफेकीचा प्रकार घडला. तसेच जमावाने काही दुकाने फोडून त्यातील साहित्य बाहेर फेकून दिले.

पाळधीत किरकोळ कारणावरुन वाद; कारची तोडफोड, दुकाने पेटवली
विलास झवर -
पाळधी (जि. जळगाव) : किरकोळ कारणावरुन पाळधी ता. धरणगाव येथे वाद झाला. त्यातून कारचालकाला मारहाणा करुन कारची तोडफोड करण्यात आली. यामुळे संतप्त जमावाने चार ते पाच दुकानांची जाळपोळ केली. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनेची तीव्रता पाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. एका भागात दगडफेकीचा प्रकार घडला. तसेच जमावाने काही दुकाने फोडून त्यातील साहित्य बाहेर फेकून दिले. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पाळधीत भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
गावात संचारबंदी सदृश्य परिस्थिती असून वादाचे कारण अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती धरणगावचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी दिली.