शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहसंमेलनाचा वाद उफाळला

By admin | Updated: February 17, 2017 00:30 IST

यावल : दोन विद्याथ्र्याना मारहाण, नऊ जणांवर गुन्हा दाखल

यावल : गेल्या आठवडय़ात शहरातील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलनात गाणे सादर करण्यावरून  झालेला वाद गुरुवारी पुन्हा उफाळून आला. जमावाने दोन विद्याथ्र्याना जबर  मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले.दरम्यान, नऊ संशयितांविरुद्ध दंगलीच्या गुन्ह्यासह अनधिकृतपणे घरात प्रवेश करणे, मारहाण करणे शिवाय जमावबंदी कायद्याचे  उल्लंघन केल्याच्या आरोपावरून दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात       आला.गेल्या आठवडय़ात साने गुरुजी    माध्यमिक  विद्यालयात स्नेहसंमेलनातील गाण्यावरून वाद झाला होता. विद्याथ्र्यासह 20 जणांविरुद्ध  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यातील सहा संशयितांना   अटक करण्यात आली. ते पोलीस कोठडीत आहेत.    पुन्हा वाद उफाळला     बारावीचा विद्यार्थी विशाल कोल्हे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास माझा मित्र कुंदन शशिकांत बडगुजर हा पॅनकार्ड काढण्यासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गेला असताना त्यास संशयित आरोपी चेतन गजरे, आनंद सुरवाडे, आकाश पारधे यांनी स्नेहसंमेलनातील गाण्यावरून आमच्या मुलांना का मारले असा प्रश्न करीत मारहाण केली. यानंतर कुंदन व त्याची आई हा प्रकार सांगण्यासाठी माङया घरी  आली व रडत कुंदनच्या आईने झालेली घटना माङया आईस सांगितली.   पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली. माझी आई कुंदनच्या आईसोबत पोलीस ठाण्यात जात असल्याचे पाहून   आरोपी हितेश गजरे, विलास भास्कर, युवराज सोनवणे, युवराज भास्कर,  चेतन गजरे, आनंद बि:हाडे, आकाश सुरवाडे, विशाल गजरे, स्वपAील पारधे व अन्य चार अनोळखी इसमांनी  माङया घरात प्रवेश करून मला  घराबाहेर काढत स्नेहसंमेलनात आमच्या पोरांना मारण्यात तू सहभागी होता तरीसुद्धा तुझी आई कुंदन बडगुजरसोबत पोलीस ठाण्यात  आमच्याविरुद्ध तक्रार देण्यास गेली  असे म्हणत संशयितांनी मारहाण केली.    कोल्हे यांच्या फिर्यादीवरून   नऊ संशयितांसह अन्य 4-5 अनोळखी इसमांविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 149, 452, 325, 324, 323, 504, 506, मुंबई पोलीस कायदा कलम  137 (1), (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक  बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुनीता कोळपकर, सहायक फौजदार व्ही. व्ही. धनगर, संजय सपकाळे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)