नुकसानीचे पंचनामे करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:14 IST2019-09-23T23:14:40+5:302019-09-23T23:14:45+5:30
एरंडोल : शेतकरी संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन

नुकसानीचे पंचनामे करावेत
एरंडोल : येथील शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना दिले.
गेल्या ३ वर्षांपासून शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत असुन शेती करणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी, यावर्षी अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मोबदला मिळावा, मागील वर्षी तालुका दुष्कळग्रस्त म्हणून घोषित होऊनही दुष्काळी अनुदान मिळाले नाही.
ते त्वरित मिळावे, असे निवेदनात म्हटले आहे. त्यावर शालिग्राम गायकवाड, रवींद्र पाटील, प्रसाद दंडवते, समाधान पाटील, हिम्मत पाटील, संदीप जाधव, देवचंद चौधरी आदींच्या सह्या आहेत.