जिल्हा बॅकेच्या बैठकीत कर्जमंजुरी, बॅकिंग, ऑडीटसह २८ विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:12+5:302021-07-14T04:19:12+5:30
जळगाव - जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या साेमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कर्जमंजुरी, बॅकिंग, अाॅडीट, प्रशासकीय अशा २८ विषयांना मंजुरी देण्यात ...

जिल्हा बॅकेच्या बैठकीत कर्जमंजुरी, बॅकिंग, ऑडीटसह २८ विषयांवर चर्चा
जळगाव - जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या साेमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कर्जमंजुरी, बॅकिंग, अाॅडीट, प्रशासकीय अशा २८ विषयांना मंजुरी देण्यात आली.अध्यक्षा अॅड.राेहिणी खडसे-खेवलकर यांच्या अध्यक्षतेखाली बॅकेच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक आयाेजीत करण्यात आली हाेती.
जिल्हा बॅकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये अल्पमुदतकर्ज, मध्यम मुदत आणि दिर्घमुदत कर्जाच्या वसुली पत्रकांची माहिती घेण्यात आली. जुन २०२१ अखेरच्या व्यवस्थापकीय, प्रशासकीय खर्चाला मान्यता देण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयाेजनाबाबत चर्चा करण्यात आली.राज्य बॅकेकडे फेरकर्ज मर्यादा वाढविण्याची मागणी करणे, बॅक कर्मचाऱ्यांच्या प्राॅव्हीडंट फंड, रिझर्व बॅकेचे अध्यादेश याबाबत माहिती घेण्यात आली. ३१ मार्च २०२१ च्या ताळेबंदाची माहिती घेण्यात आली. मालखेडा येथील श्याम स्टाेन क्रेशरला सभेत कर्ज मंजुर करण्यात आले. यावेळी बॅकेच्या अध्यक्षा अॅड.राेहिणी खडसे, उपाध्यक्षा आमदार किशाेर पाटील, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, संजय पवार, डाॅ.सुरेश पाटील, अमाेल पाटील यांच्यासह अन्य संचालक उपस्थित हाेते.