शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागात अपहार

By admin | Updated: July 18, 2014 13:01 IST

गैरहजर सफाई कर्मचार्‍यांची मुकादमाने गैरहजर अशी नोंद केल्यानंतरही त्यावर अन्य व्यक्तींचे अंगठे लावून हजेरी दर्शवून मनपाचे लाखो रुपये आरोग्य निरीक्षकाने हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 

 
जळगाव : गैरहजर सफाई कर्मचार्‍यांची मुकादमाने गैरहजर अशी नोंद केल्यानंतरही त्यावर अन्य व्यक्तींचे अंगठे लावून हजेरी दर्शविण्यात आल्याचा व या माध्यमातून मनपाचे लाखो रुपये आरोग्य निरीक्षकाने संबंधित कर्मचार्‍यांच्या संगनमताने हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच डिझेलचाही घोळ असल्याचे आढळून आले आहे. 
सहा महिन्यांपासून गैरप्रकार सुरू 
युनिट क्र.चार मधील सुरेश जावळे हा कायम सफाई कर्मचारी कधीही कामावर येत नसल्याची तक्रार आहे. मात्र त्याची नियमित हजेरी लावली जात असल्याची तक्रार आल्याने युनिट क्र.चारमधील चारही मुकादमांकडून आरोग्य निरीक्षकांकडे व तेथून वरिष्ठांकडे पाठविलेल्या हजेरीपत्रकाची तपासणी केली असता सुरेश जावळे यांची तसेच इतर काही गैरहजर कर्मचार्‍यांची मुकादमाने गैरहजेरी लावलेली असताना आरोग्य निरीक्षक पी.आर. चव्हाण यांनीच या गैरहजेरीवर कर्मचार्‍यांचे अंगठे लावून हजेरी दर्शविल्याचे आढळून आले आहे. त्यात सुरेश जावळे यांची मार्च ते मे २0१४ या तीन महिन्यांच्या कालावधीत गैरहजर असूनही मुकादमाने केलेल्या 'गैर' या नोंदीवर दररोज हजेरी लावल्याचे आढळून आले आहे. 
तसेच इतर कायम सफाई कर्मचार्‍यांचीही गैरहजेरी नोंदविलेली असताना त्यावर अंगठा टेकविल्याचे आढळून आले आहे. 
लाखोंची हेराफेरी
गैरहजर असताना हजेरी लावून संबंधित कर्मचार्‍याशी संगनमत करून या पैशांचा अपहार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. एका कायम सफाई कर्मचार्‍याचा महिन्याचा पगार १५ ते २0 हजारांच्या आसपास आहे. एका कर्मचार्‍याची सलग सहा महिने बोगस हजेरी लावली तरीही लाख रुपये होतात. 
याखेरीज एकाच मुकादमाकडील अन्य कर्मचार्‍यांच्याही दोन-चार दिवसाआड असलेल्या गैरहजेरीच्या जागी बोगस हजेरी लावली गेली आहे. युनिट क्र.चारमध्ये एकूण चार मुकादम आहेत. यावरून या गैरप्रकाराचा आवाका लक्षात येतो. या हेराफेरीतून मनपाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पाठबळ कुणाचे?
युनिट क्र.चारमध्ये हा घोळ उघडकीस आला असला तरीही इतरही युनिटमध्ये असाच घोळ असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लक्षात हा प्रकार येत नसावा, असे म्हणता येणार नाही. कारण गैरहजेरी लावलेल्या जागी अंगठे लावलेले लगेच दिसून येत आहेत. असे असतानाही बिले निघाल्याने वरिष्ठांची संमती आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान पी.आर.चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
 
आरोग्य विभागातील आणखी एक प्रकार आयुक्तांच्या यापूर्वीच निदर्शनास आला आहे. त्यात रविवारी सुटीच्या दिवशीही मजूर लावलेले दर्शविण्यात आले आहे. तब्बल १२८ मजूर जादा लावल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशीचे आदेश मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी मुख्य लेखा परीक्षक सुभाष भोर यांना दिले आहेत. सर्वच स्तरावर दुर्लक्ष झाल्याने झाला गैरप्रकार अशा प्रकारच्या एका प्रकरणाची चौकशी बुधवारीच मुख्य लेखा परीक्षकांकडे सोपविली आहे. हे प्रकरण तेच आहे का? ते तपासावे लागेल. वेगळे असल्यास या प्रकरणाचीही चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.
-संजय कापडणीस,
आयुक्त, मनपा कायम कर्मचार्‍यांची हजेरी आरोग्याधिकार्‍यांमार्फत तपासून आस्थापना विभागाकडे व तेथून लेखा परीक्षण विभागाकडे येते. त्यामुळे हा प्रकार लक्षात यायला हवा होता. याबाबत सखोल चौकशी करून रकमेची वसुली केली जाईल.
-सुभाष भोर, मुख्य लेखा परीक्षक, मनपा 
----------------
दरमहा ७0 लीटर डिझेलची उचल युनिट क्र.चारमध्ये गटार साफ करण्यासाठी रॉडिंग मशीन वापरले जाते. त्या नावावर दरमहा तब्बल ७0 लीटर डिझेलची उचल केली जात असल्याचे समजते. मात्र याबाबत वाहन विभागप्रमुख शशिकांत बोरोले यांना विचारणा केली असता मशिनरीसाठीचे डिझेल हे संबंधित अधिकारी स्वत:च्या अधिकारातच मागवित असल्याचे सांगितले. तसेच रॉडिंगमशीन अगदी संपूर्ण दिवसभर चालविले तरच तीन-चार लीटर डिझेल दिवसाला लागते. मात्र या मशीनचा एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर वापर होत नसल्याने एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर डिझेल कसे दिले जात आहे ? याबाबत संबंधितांनी काय तपासणी केली? असा सवाल उपस्थित होत आहे. कायम सफाई कर्मचार्‍यांच्या हजेरी तपासणीची जबाबदारी मुकादमावर असून त्यानंतर हे पगारबिल आरोग्य निरीक्षकांकडून आरोग्याधिकारी व आस्थापना विभागाकडे जाते. तेथे हजेरीपत्रक तपासून मुख्य लेखा परीक्षकांकडे व तेथून उपायुक्तांकडे मंजुरीसाठी जाते. मात्र आरोग्याधिकारी, आस्थापना अधीक्षक, मुख्य लेखा परीक्षक अथवा उपायुक्त यांच्यापैकी कुणाच्याही लक्षात हा प्रकार आला नाही, हेच यावरून लक्षात येते. मासिक लेखापरीक्षणातही ही बाब कशी लक्षात आली नाही? असाही मुद्दा उपस्थित होते. युनिट क्र.४ला सर्वाधिक कर्मचारी युनिट क्र.४ अंतर्गत प्रभाग क्र.६, ७ व २१ हे ३ प्रभाग येतात. त्यामुळे या युनिट अंतर्गत सर्वाधिक ७८ कर्मचारी देण्यात आले आहेत. त्या तुलनेत ५ प्रभागांची जबाबदारी असलेल्या युनिट क्र.१0 मध्येदेखील कमी कर्मचारी आहेत.