शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अवर्षण प्रवण क्षेत्रास प्रत्यक्ष लाभ मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 8:00 PM

सात बलून बंधारे प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

विजयकुमार सैतवालजळगाव : अवर्षण प्रवण क्षेत्रात येणाऱ्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जळगाव तालुक्यासाठी गिरणा नदीवर सात बलून बंधारे प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या तालुक्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे सुमारे सहा हजार ४०० हेक्टर सिंचन क्षेत्र सिंचनाखाली येणार असून गिरणा परिसरातील पाच नगरपालिका व सुमारे ९० ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पाण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध होण्यासह औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा यामुळे पाणी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्याचा खरोखर लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.केंद्र शासनाचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवरील सात बलून बंधारे प्रकल्पास २८ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असून ७११ कोटींपेक्षा जास्त किंंमतीच्या अंदाजपत्रकासही मान्यता मिळाली आहे. या सात बंधाºयांमुळे जळगाव, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या तालुक्यातील ६ हजार ४०० हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील १६८ किलो मीटर लांबीच्या पट्यातून गिरणा नदी वाहात जाते. गिरणाला मिळणाºया बोरी, तितूर व अंजनी या नद्यांना पावसाळ्यात बरेच पाणी येते व जळगाव तालुक्यात तापी नदीला मिळून वाहून जाते. पावसाळ्यानंतर या नद्यांच्या क्षेत्रात मात्र पाण्याचे दरवर्षी दुर्र्भिक्ष असते. त्यावर मात करण्यासाठी गिरणाचे वाहून जाणारे पाणी अडविले जावे यासाठी २००३ पासून प्रयत्न होते. अखेर बलून बंधारे बांधण्याचे निश्चित होऊन त्याचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे, बहाळ, भडगाव तालुक्यातील पांढरद, भडगाव, पाचोरा तालुक्यातील परधाडे, कुरंगी आणि जळगाव तालुक्यातील कानळदा येथे बलून बंधारे बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. जलसंपदा विभागाने २९ जून २०१५ रोजी अन्वेषण अहवालास शासनाने तत्वत: मान्यताही दिली होती.गिरणा नदीवरील या सात बंधाºयांचा प्रकल्प केंद्र शासनाचा पायलट प्रोजेक्ट योजनेत समावेश करण्यात आला. तत्कालीन केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी या प्रकल्पाची माहिती घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल सहा महिन्यात सादर करण्याचे आदेश दिले होते. जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळास तापी पाटबंधारे महामंडळाने प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जळगाव प्रकल्प मंडळाने प्रकल्प अहवाल तयार सादर केला. त्यास आता राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून मान्यता मिळाली. सदर प्रकल्पाचा तापी एकात्मिक जल आराखडामध्ये समावेश करण्यात आला आहे. या मध्यम प्रकल्पासाठी ७११ कोटी १५ लाख २३ हजार रुपये किंमतीच्या अंदाजपत्रकासदेखील सशर्त प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी १०० टक्के निधी पुरवठा केंद्र सरकारमार्फत केला जाईल, या अटीवर राज्यपालांनी दिली आहे.मेहरूणबारे, बहाळ, पांढरद, भडगाव, परधाडे, कुरंगी, कानळदा येथे होणाºया या बंधाºयांचा खरोखर लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव