शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
3
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
4
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
5
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
7
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
8
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
9
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
11
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
12
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
13
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
14
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
15
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
16
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
17
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
18
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
19
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
20
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी एकाच रुग्णांचे वेगवेगळे रिपोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 12:32 IST

कारभाराबाबत आश्चर्य : पहिले पॉझिटिव्ह तर तासाभरानंतरचा रिपोर्ट निगेटीव्ह; सोशल मीडियावर रिपोर्ट व्हायरल

जळगाव : कोरोना रुग्णांची एकीकडे संख्या वाढत असताना दुसरीकडे एकाच व्यक्तीचे एकाच दिवशी दोन वेगवेगळे रिपोर्ट आल्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून घेण्यात येत असलेल्या रॅपीड अ‍ॅँटीजन टेस्टबाबत देखील साशंकता निर्माण होत आहे.मनपाच्या शिवाजीनगर भागातील रुग्णालयात संबधित रुग्णांचा पहिला रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. तर तासाभरानंतरच मनपाच्या शाहू रुग्णालयात तपासणी केल्यानंतर संबधित रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे संपूर्ण यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.राष्टÑवादी महानगर सरचिटणीस योगेश कदम यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता शिवाजीनगर मधील मनपाच्या रुग्णालयात रॅपीड र्अॅटीजन टेस्ट केली. या तपासणीचा अहवालात कदम यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता मनपाच्या शाहू नगरातील रुग्णालयात त्यांनी परत टेस्ट केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. एका तासाच्या काळातच त्यांचे वेगवेगळे रिपोर्ट आल्यामुळे कदम नेमके कोरोनाबाधीत आहेत का, निगेटीव्ह ? याबाबत शंका निर्माण होत आहेत. मात्र, या वेगवेगळ्या रिपोर्टमुळे अ‍ँटीजन टेस्ट मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. कदम यांचे दोन्ही रिपोर्ट राष्टÑवादीचे महानगरप्रमुख अभिषेक पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर मनपाचा भोंगळ कारभाराची जोरदार चर्चा शहरभर पसरली.योगेश कदम घरीच झाले क्वारंटाईनएकाच दिवशी दोन वेगवेगळे रिपोर्ट आल्यामुळे योगेश कदम देखील संभ्रमात आले होते. दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे कदम यांनी कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल न होता.ते घरीच क्वारंटाईन झाले आहेत. कदम यांना फारसे लक्षणे नसून, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरु केला आहे.मात्र, एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे रिपोर्ट आल्यामुळे मनपाच्या रुग्णालयात सावळा गोंधळ सुरु असून, या कारभाराबाबत चौकशी करण्याची मागणी राष्टÑवादीचे महानगरप्रमुख अभिषेक पाटील यांनी केली आहे.माता बालसंगोपण केंद्र मनपाचे नाहीसोशल मीडियात हे रिपोर्ट व्हायरल झाल्यानंतर नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मनपा वैद्यकीय विभागाच्या महिला डॉक्टरांशी चर्चा करत याप्रकरणाची माहिती घेतली. त्यात महिला डॉक्टरने संबंधित रुग्णाने दुसरी टेस्ट केलेले माता बालसंगोपण केंद्र मनपाचे नसल्याचे सांगितले.तर अभिषेक पाटील यांनीही संबधित रुग्णांशी चर्चा केलेले रेकॉर्डींग सोशल मीडियात व्हायरल केली आहे. त्यात संबधित रुग्णाने शाहू महाराज रुग्णालयातच टेस्ट केल्याचे सांगत आहे. यामुळे हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.अ‍ॅण्टीजन चाचण्यांच्या बाबतीत आयसीएमआरने निष्कर्ष दिले आहेत, ते असे-रॅपीड अ‍ॅन्टीजन चाचणी जर पॉझिटीव्ह आली तर रुग्ण शंभर टक्के पॉझिटीव्ह-अ‍ॅन्टीजन चाचणी जर निगेटीव्ह आली आणि रुग्णाला लक्षणे असतील तर त्याची आरटीपीसीआर तपासणी करून निदान करावे लागते़- अ‍ॅन्टीजन चचणी निगेटीव्ह आली आणि जर लक्षणे नसतील तर तपासणी करणाऱ्याला निगेटीव्हच ग्राह्य धरावे़4 रॅपीड अ‍ॅन्टीजन चाचणी ही स्क्रिनींग चाचणी आहे़- ज्या तरूणाची पहिली तपासणी पॉझिटीव्ह आली होती शिवाय त्याला लक्षणे होती तरीही त्याने दुसºया केंद्रावर जावून त्या ठिकाणी कुठलीही कल्पना न देता तपासणी करू घेणे ही मोठी चूक आह़े पहिल्या व दुसºया तपासणी दरम्यान चहा घेणे, शिंक येणे, किंवा स्वॅब घेताना नाक हलणे, शिंका येणे यामुळे नमुन्यात अ‍ॅन्टीजन येत नाहीत, व्हायरल लोड कमी होणे, यामुळे अ‍ॅन्टीजन न येता तपासणी निगेटीव्ह येऊ शकते, त्यामुळे पहिली पॉझिटीव्ह व दुसरी निगेटीव्ह असे काहीच लॉजीक यामागे लावता येणार नाही, असे एका डॉक्टरचे म्हणणे आहे़-पहिली तपासणी पॉझिटिव्ह म्हणजे रुग्ण पॉझिटीव्ह़ त्याने तातडीने उपचार घेणे गरजेचे आहे ़ अन्यथा धोका त्यालाच आहे, असे एका डॉक्टरांनी या प्रकरणात नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे़ अ‍ॅन्टीजन चाचणी ही स्क्रिनींग टेस्ट आहे ते निदान नाही़ त्यामुळे निगेटीव्ह आलेली व्यक्तिी निगेटीव्हच असते याची श्वास्वती नाही, पॉझिटीव्हची मात्र यात शंभर टक्के शास्वती आहे़ त्यामुळे नागरिकांनी या बाबी समजू घेणे गरजेचे आहे़ लवकर निदानासाठी या तपासण्या आहेत़ आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनाही तशाच सांगतात, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे़- माता बालसंगोपन केंद्र नक्की कोणाचे ?दोन अहवालांच्या वादात माता बालसंगोपन केंद्र नक्की कोणाचे हा प्रश्न समोर उपस्थित झाला होता़ संबंधित तरूणाची पहिली तपासणी ही शिवाजीनगरमध्ये दुसरी माताबालसंगोपन रुग्णालयात झाली़ दोन्ही चिठ्ठ्यांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची शिक्का व स्वाक्षरी आहे़ ज्या ठिकाणी ही दुसरी तपासणी झाली ते माता बालसंगोपन केंद्र नक्की कोणाचे या प्रश्नावर चर्चा रंगल्या होत्या़ एका बाजूने यात महापालिकेचे नाही असे तर दुसºया बाजूने ते महापालिकेचेच असा दावा केला जात होता़ सोशल मीडियावर चर्चा होती़या प्रकरणाची माहिती घेतली असून, याबाबत अ‍ॅँटीजन टेस्ट केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट हा खराच मानला जातो. मात्र, तरीही या व्यक्तीने दुसºयांदा टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट निगेटीव्ह आला. त्यामुळे त्या रुग्णाला वैद्यकीय अधिकाºयांनी आरटीपीसीआरची टेस्ट करायला सांगितली आहे. त्याप्रमाणे रुग्णाने ती टेस्ट करून घ्यायला हवी. आरटीपीसीआर अधिक अधिकृत आणि प्रभावी टेस्ट आहे.-सतीश कुलकर्णी, आयुक्त, मनपाअ‍ँटीजन टेस्टमधील निगेटीव्ह रिपोर्ट खरा नसतो-अगोदर त्याचा रिपोर्ट शिवाजी नगर ला पॉझिटिव्ह आला आहे तोच रिपोर्ट खरा आहे. अँटीजन टेस्ट मध्ये १०० टक्के रिपोर्ट खरा नसतो परंतु जो रिपोर्ट पॉझीटीव्ह आहे़-तोच रिपोर्ट खरा मानावा संबधित रुग्णाने डबल चाचणी करायला नको होती असेच जर डबल चाचण्या सर्वांनी केल्या तर जवळ जवळ ४० टक्के रिपोर्ट संभ्रमात येऊ शकतात . आरटीपीसीआर टेस्ट खरी असते, मात्र, रुग्ण पॉझीटीव्ह आहे की नाही हे लवकरच कळावे व त्यावर लवकर निदान करण्यात यावे यासाठी अँटीजन टेस्ट केली जाते अशी माहिती मनपाच्या वैद्यकीय विभागाच्या अधिकाºयांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव