ध्येयवेड्या तरुणाचा सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:19 IST2021-08-13T04:19:56+5:302021-08-13T04:19:56+5:30
भुसावळ : पर्यावरण रक्षणासाठी कोणतीही शासकीय मदत न घेता ‘एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं’ ही मोहीम हाती ...

ध्येयवेड्या तरुणाचा सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास
भुसावळ : पर्यावरण रक्षणासाठी कोणतीही शासकीय मदत न घेता ‘एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं’ ही मोहीम हाती घेत सह्याद्री ते हिमालय असा सुमारे दोन हजार किलोमीटरचे अंतर पायी चालत देशातील नागरिकांना पर्यावरण रक्षणासोबतच ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत भिवंडीतील २४ वर्षीय तरुणाने आगळी मोहीम हाती घेतली आहे.
सिद्धार्थ गणाई असे या २४ वर्षीय पर्यावरणवादी ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे. गेल्या नऊ दिवसांपूर्वी २० जुलैला त्याने रायगड येथील शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सह्याद्री ते हिमालय या मोहिमेला सुरुवात केली आहे.
या मोहिमेत प्रकृती बिघडू नये म्हणून फक्त घरचे जेवण व पाणी मिळावे असे आवाहन तो पायी जाताना करत आहे. प्रत्येक ठिकाणी थांबून एक एक झाड लावून ‘एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं’ हा सामाजिक संदेश देत आहे.
तो भुसावळला दुपारी गांधी पुतळ्याजवळ पोहचला. तेव्हा चंद्रकांत चौधरी, संजीव पाटील, किरण मिस्तरी, हाजी जावेद शेख, नाना पाटील, सुरेंद्र पाटील, राजेंद्र जावळे, सुरेंद्रसिंग पाटील, संजीव पाटील, राजश्री नेवे, किरण मिस्तरी, सतीश कांबळे, चेतन गागाई यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी वृक्षारोपण करून तो पुढे मार्गस्थ झाला.