तरुणाच्या हातातून धुमस्टाईलने मोबाईल लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 21:17 IST2021-03-06T21:16:25+5:302021-03-06T21:17:29+5:30
जळगाव : मोबाईलवर बोलत असलेल्या दिनकर शामराव तायडे (३०) या तरुणाच्या हातातून धूम स्टाईलने मोबाईल हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी ...

तरुणाच्या हातातून धुमस्टाईलने मोबाईल लांबविला
जळगाव : मोबाईलवर बोलत असलेल्या दिनकर शामराव तायडे (३०) या तरुणाच्या हातातून धूम स्टाईलने मोबाईल हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजता छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनुर खुर्द येथील रहिवासी दिनकर तायडे हा तरुण शिक्षणासाठी शहरातील आयएमआर महाविद्यालयाच्या परिसरात वास्तव्यास राहतो. शुक्रवारी रात्री १० वाजता छत्रपती शाहू महाराज रग्णालयाजवळून कुटुंयांीशी मोबाईलवर बोलत असताना मागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. त्यानंतर दिनकर याने रात्रीच जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सात हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.