धोनी एक विशेष बाब वाटतो - कपिल देव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST2021-09-13T04:16:45+5:302021-09-13T04:16:45+5:30
नवी दिल्ली : एखाद्या खेळाडूने निवृत्ती घेतली तर त्याने तीन ते चार वर्षांनी संघासोबत जोडले गेले पाहिजे. मात्र निवृत्तीनंतर ...

धोनी एक विशेष बाब वाटतो - कपिल देव
नवी दिल्ली : एखाद्या खेळाडूने निवृत्ती घेतली तर त्याने तीन ते चार वर्षांनी संघासोबत जोडले गेले पाहिजे. मात्र निवृत्तीनंतर एक वर्षाने महेंद्र सिंह धोनी याची संघाचा मेंटॉर म्हणून झालेली निवड ही एक विशेष बाब वाटते. मात्र हा एक चांगला निर्णय असल्याचे माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटले आहे. १९८३च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल यांच्या मते निवृत्तीनंतर खेळाडूने तीन वर्षांनी तरी संघासोबत पुन्हा जोडले जावे असे म्हटले आहे.
टी २० सामन्यात कुत्रा मैदानात
डब्लीन : महिलांच्या ऑल आयर्लंड टी२० चषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शनिवारी ब्रेडी आणि सीएसएनआय या सामन्यात एक कुत्रा मैदानात घुसला होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडीयोत हा कुत्रा बॉलदेखील तोंडात घेऊन पळत होता.
मनिकाच्या आरोपांवर तपास समिती गठीत
नवी दिल्ली : भारतीय टेबल टेनिस महासंघाने मनिका बात्रा हिने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्यावर केलेल्या सामनानिश्चितीच्या आरोपांवर ५ सदस्यीय समिती गठीत केली आहे. मनिका हिने सौम्यदीप रॉय यांच्यावर आरोप केले होते की, मार्चमध्ये ऑलिम्पिक क्वालिफायरच्यादरम्यान तिला सामन्यात पराभूत होण्यास सांगितले होते.
आम्ही घरी परतलो - रोहित
दुबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा परिवारासह दुबईत पोहोचला आहे. आयपीएल २०२१ची दुसरी फेरी युएईत होणार आहे. इंग्लंडहून रोहित पत्नी रितिका आणि मुलगी समायरासह दुबईत पोहोचला. त्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘घरी परतलो.’ इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर एका दिवसानंतर रोहित युएईत पोहोचला आहे.
माझा दात तुटला, आयपीएलला दोष देऊ शकतो का - इरफान
नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर आयपीएलला दोष देणाऱ्यांना इरफान पठाण याने सणसणीत उत्तर दिले आहे. त्याने ट्विट केले की, माझा दात तुटला आहे. यासाठी मी आयपीएलला दोष देऊ शकतो का? ’ पठाण याने दोष देण्यासाठी आयपीएल हे एक सॉफ्ट टार्गेट असल्याचे मतदेखील व्यक्त केले आहे.