धरणगाव मुख्याधिकारी अपघातातून बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 15:44 IST2021-01-20T15:44:07+5:302021-01-20T15:44:44+5:30
धरणगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार हे अपघातातून बचावले आहेत.

धरणगाव मुख्याधिकारी अपघातातून बचावले
ठळक मुद्देनाशिकवरून येत असताना अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी अधिकारी जनार्दन पवार यांच्या वाहनाला मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने मुख्याधिकारी यांना मोठी दुखापत झाली नाही.
मुख्याधिकारी पवार हे नाशिक येथे मिटींगला गेले होते. नाशिक येथील काम आटोपून परत येत असताना मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पिंप्री जवळील पुलाजवळ वाहनवरील त्यांचे नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे कार रस्त्यालगत खड्ड्यात जाऊन पडली. पवार यांनी सीटबेल्ट लावले होते. तसेच एअरबॅग उघडल्यामुळे त्यांना मोठी दुखापत झाली नाही.