धरम सांखलाचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 22:31 IST2021-01-29T22:31:27+5:302021-01-29T22:31:40+5:30
जळगाव - बीएचआर प्रकरणातील संशयित धरम सांखलाचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सीए महावीर जैन याचा जामीन ...

धरम सांखलाचा जामीन अर्ज फेटाळला
जळगाव - बीएचआर प्रकरणातील संशयित धरम सांखलाचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
सीए महावीर जैन याचा जामीन अर्ज न्यायालयाने २२ जानेवारीला फेटाळून लावला होता. त्यानंतर डेक्कनच्या गुन्ह्यात सुजित वाणी, विवेक ठाकरे यांचा जामीन अर्ज नाकारण्यात आला होता. शुक्रवारी धरम सांखला याच्या जामीन अर्जावर पुण्यातील विशेष न्यायाधीश एस.एस.गोसावी यांच्या न्यायालयात कामकाज झाले. सुनावणीअंती सांखला याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे.