जवानांच्या रक्षणासाठी भाविकांचे सलग तीन तास ‘महामृत्यंजय’ मंत्र जप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:37 PM2019-09-10T12:37:22+5:302019-09-10T12:37:55+5:30

जळगाव : देशातील जवानांच्या रक्षणासाठी सोमवारी सलग तीन तास भाविकांकडून गोलाणी मार्केटमधील महादेव-हनुमान मंदिरात ‘महामृत्यूंजय’ मंत्राचे जप करण्यात आले़ ...

 Devotees chant 'Mahamaritanjay' chant for three consecutive hours to protect the soldiers | जवानांच्या रक्षणासाठी भाविकांचे सलग तीन तास ‘महामृत्यंजय’ मंत्र जप

जवानांच्या रक्षणासाठी भाविकांचे सलग तीन तास ‘महामृत्यंजय’ मंत्र जप

Next

जळगाव : देशातील जवानांच्या रक्षणासाठी सोमवारी सलग तीन तास भाविकांकडून गोलाणी मार्केटमधील महादेव-हनुमान मंदिरात ‘महामृत्यूंजय’ मंत्राचे जप करण्यात आले़ याप्रसंगी सर्व भाविक भक्तीरसात तल्लीन झालेले होते़
सार्वजनिक गणशोत्सव महामंडळाकडून दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात़ दरम्यान, या वर्षापासून देशातील जवानांच्या रक्षणासाठी व सुरक्षेसाठी महामृत्यूंजय मंत्राचा जाप हा उपक्रम सुरू करण्यात आला़ त्यानुसार दुपारी ४ वाजता जापला सुरूवात झाली तर सलग तीन तास हा जाप सुरू होता़ सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, एम़पी़जोशी, सचिन नारळे, किशोर भोसले यांच्याहस्ते आरती करण्यात येऊन उपक्रमाचा समारोप करण्यात आला़ यावेळी सुरज दायमा, भूषण शिंपी, राकेश तिवारी, ललित चौधरी, रवींद्र नेरपगारे, भगवतीप्रसाद मुंदडा, जितेंद्र बारी, दिनेश जगताप, सुजित जाधव, धनंजय चौधरी, दीपक दाभाडे, कुणाल मेटकर, विनय बाहेती, राकेश लोहार, महेश शिंपी, दीपक ओझा, अजय हर्षल झाल्टे, गोपाल रामावत आदींची उपस्थिती होती़
जवान चंदू चव्हाण यांची उपस्थिती
सोमवारी जवान चंदू चव्हाण व लान्स नायक गिरीश चौधरी व विजया चौधरी यांच्याहस्ते महादेवाची पूजा करून महामृत्यूंजय मंत्राला सुरूवात करण्यात आली़

Web Title:  Devotees chant 'Mahamaritanjay' chant for three consecutive hours to protect the soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.